TRENDING:

जमिनीचा 100 टक्के वापर, ऊसाच्या शेतीत घ्या हे आंतरपीक, दोन महिन्यातच होणार मोठा फायदा

Last Updated:
Intercropping in Sugarcane : ऊसाचे पिक तयार व्हायला 1 वर्षे लागते. त्यामध्ये ऊसाच्या दोन लाइनमध्ये 75 सेंटीमीटरचे म्हणजे 2 फूट अंतर असावे, असे तज्ज्ञ सांगतात. भारतात अनेक शेतकरी ही 2 फुटाची जागा खाली सोडतात. तर हिरव्या मिरचीचे पीक हे 60 ते 65 दिवसात तयार होते. यातून शेतकरी आंतरपीक घेऊन चांगला नफा कमावू शकतात. (सिमरनजीत सिंग/शाहजहांपूर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
जमिनीचा 100 टक्के वापर, ऊसाच्या शेतीत घ्या हे आंतरपीक, दोन महिन्यातच मोठा फायदा
पंत चिली-1 हे जातीचे बियाणे चांगल्या उत्पादनासाठी आणि चवीसाठी ओळखले जाते. याचे प्रती हेक्टर 75 क्विंटल उत्पादन होते. पिकल्यावर व खुडल्यावर हेक्टरी 1.5 टन पर्यंत उत्पादन मिळते. ही एक मोज़ेक आणि लीफ कर्ल व्हायरस प्रतिरोधक जाती आहे. या जातीची पहिली तोडणी 60 ते 65 दिवसांत करता येते. ही जात उसाच्या आंतरपीकासाठी उत्तम आहे.
advertisement
2/5
मिरचीसाठी हे वाण जास्त उत्पादन आणि रोग प्रतिकारक क्षमतेसाठी ओळखले जाते. यातून एका हेक्टरमध्ये 95 क्विंटल उत्पादन मिळते. लागवडीनंतर 75 ते 80 दिवसात पहिली तोडणी होऊ शकते. यातून शेतकरी 5 ते 5 महिन्यांत 4 ते 5 वेळा तोडणी करू शकतात.
advertisement
3/5
हिरवी मिरचीचे हे वाण प्रति हेक्टरमध्ये 80 ते 85 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न देते. 65 ते 70 दिवसात शेतकरी पहिली तोडणी करू शकतो. ही मिरची 9 ते 10 सेंटीमीटर लांब असते.
advertisement
4/5
हिरवी मिरचीची मेघना ही जातही उत्तम आहे. यातून प्रतिहेक्टर 300 ते 350 क्विंटल उत्पादन होऊ शकते. 60 ते 65 दिवसात पहिली तोडणी होते. चांगली देखभाल केल्यास 4 ते 5 महिने पीक मिळते. ही मिरची 10 सेंटीमीटर लांब असते.
advertisement
5/5
अर्का मेघनापासून तुम्ही प्रति हेक्टर 300 ते 350 क्विंटल हिरवी मिरची आणि 5 टन कोरडी मिरची प्रति हेक्टर उत्पादन घेऊ शकता. 55 ते 60 दिवसात तुम्ही पहिली तोडणी करू शकता. ही मिरची पिकल्यावर लाल होते. (सूचना-ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
जमिनीचा 100 टक्के वापर, ऊसाच्या शेतीत घ्या हे आंतरपीक, दोन महिन्यातच होणार मोठा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल