शेतकऱ्याचा नादच खुळा! 25 म्हशीपासून सुरु केला दुग्ध व्यवसाय, आता बांधला 1 कोटींचा बंगला!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
25 जाफराबादी म्हशींच्या संगोपनातून हा तरुण महिन्यासाठी तब्बल दीड लाख रुपये निव्वळ नफा कमवतो.
advertisement
1/7

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात आपण यशाचं सर्वोच्च टोक गाठू शकतो हे सिद्ध करून दाखवले जालना जिल्ह्यातील मांडवा येथील गणेश बारसे या तरुणाने.
advertisement
2/7
25 जाफराबादी म्हशींच्या संगोपनातून हा तरुण महिन्यासाठी तब्बल दीड लाख रुपये निव्वळ नफा कमवतो. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला लाजवेल अशा पद्धतीचं पॅकेज कमवणारा हा तरुण दुग्ध व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो हे लोकल 18 च्या प्रतिनिधीने त्याच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
3/7
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावात बहुतांश दुग्ध व्यावसायिक राहतात. परंपरेने बारसे कुटुंब देखील पिढ्यापासून दुग्ध व्यवसायात आहे. त्यांच्याकडे 25 जाफराबादी म्हशी आहेत. या 25 म्हशींपैकी 12 ते 15 म्हशी दूध देतात. एक म्हैस साधारणपणे 12 ते 14 लिटर दिवसाला दूध देते.
advertisement
4/7
दिवसाकाठी साधारणपणे 150 ते 160 लिटर दूध त्यांना मिळतं. या दुधाला 60 ते 65 रुपये प्रति लिटर असा दर मिळतो. दिवसाला साधारणपणे 10 ते 12 हजार रुपये ते कमवतात.
advertisement
5/7
यातील 50 टक्के कमाई खर्चात जाते. तरी देखील बारसे हे दिवसाला 5 ते 6 हजारांचे निव्वळ उत्पन्न कमवतात. तर महिन्याकाठी दीड लाखांचं उत्पन्न त्यांना हमखास मिळतं. याच जोरावर त्यांनी आपल्या म्हशींच्या गोठ्याशेजारीच टोलेजंग 1 कोटी रुपये खर्चून इमारत बांधली आहे.
advertisement
6/7
'आमच्या घरातील सर्वजण काम करतात. त्याचबरोबर एक महिला आणि एका पुरुषाला आम्ही आमच्याकडे रोजगार दिला आहे. सकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत म्हशींचे काम चालते. यानंतर आम्ही शेतातील कामे पाहतो. स्वतःचे शेत असल्याने चार ते पाच एकर शेतामध्ये वैरणेची देखील व्यवस्था केली आहे.
advertisement
7/7
तर इतर वैरण बाजारातून खरेदी करतो. याच व्यवसायाच्या बळावर आम्ही 90 लाख ते एक कोटी रुपये खर्च करून ते घर बांधू शकलो. अनेक तरुण आज नोकरीच्या मागे धावताना पाहायला मिळतात. 10 ते 15 हजार रुपये पगाराची नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायात उतरून भरभराट करावी, असं आवाहन देखील गणेश बारसे यांनी तरुणांना केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
शेतकऱ्याचा नादच खुळा! 25 म्हशीपासून सुरु केला दुग्ध व्यवसाय, आता बांधला 1 कोटींचा बंगला!