TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
विजांसह हलक्या पावसाची, तसेच गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची, तसेच गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडिचा कडाका अंशत: कमी झाला असून रविवारी 32 कमाल आणि 16.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज कमाल तापमान 33 अंशापर्यंत राहिल. तसेच किमान तापमानात वाढ पारा 17 अंश सेल्सिअस राहिल. अंशत ढगाळ आकाशा, विजांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
साताऱ्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे. रविवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.7 अंशावर राहिला. तर 17.7 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 18 ते कमाल 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणातील थंडी गायब होवून कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहिल. तसेच किमान तापमानाचा पारा 20 अंशापर्यंत राहिल. आज गारठा कमी राहून विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात काल रविवारी कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान 20.5 अंशावर राहिले. आज कमाल तापमानाचा पारा 35 अंशावर राहिल. तसेच किमान तापमानाचा पारा 21 अंशापर्यंत राहिल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 19 अंशावर राहिल. अंशतः ढगाळ आकाश राहिल. जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
सध्या दक्षिण भारतासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले असून आकाश ढगाळ होत आहे. आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी राज्यात गारठा कमी होणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल