TRENDING:

Farmer Success Story: शेतकऱ्यानं केली शेतात 750 झाडांची लागवड, उत्पन्न मिळतेय लाखात, असं काय केलं?

Last Updated:
Mosambi Farming: मराठवाड्यातील शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याने मोसंबी शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे.
advertisement
1/7
शेतकऱ्यानं केली शेतात 750 झाडांची लागवड, उत्पन्न मिळतेय लाखात, असं काय केलं?
सध्याच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एक शेतकरी मोसंबी शेतीतून लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
2/7
योगेश घावटे असं सटाणा येथील या मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांच्याकडे 5 एकर मोसंबी शेती असून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/7
सटाणा येथे घावटे यांनी सर्वप्रथम 2005 साली 1 एकर मध्ये 200 मोसंबी झाडांची 15 बाय 15 अशी लागवड केली होती. या मोसंबी लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाले. त्यानंतर 2012 मध्ये देखील 3 एकर मध्ये लागवड केली. अशी एकूण साडेपाच एकर मध्ये मोसंबीची लागवड आहे.
advertisement
4/7
जवळपास गेल्या 20 वर्षांपासून मोसंबी शेती करत असल्यामुळे चांगला अनुभव आला. अनुभवामुळे मोसंबी शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले, असे घावटे यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.
advertisement
5/7
योगेश यांच्या बरोबर त्यांचे भाऊ राम घावटे हे देखील मोसंबी शेतीसाठी त्यांना मदत करतात. लागवड चांगल्या प्रकारे केलेली आहे. तसेच झाडांची देखभाल देखील चांगल्या पद्धतीने केली जाते.
advertisement
6/7
मात्र बाजारभावावर देखील उत्पन्नाचे सर्व काही अवलंबून आहे. निसर्गाने चांगली साथ दिली तर मोसंबीच्या उत्पन्नाला तोड नाही. मोसंबीसाठी शेणखताचा वापर करण्यात येतो. तसेच खताचा वापर करून पाणी देखील देण्यात येते. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे फळ चांगले पोसलेले असल्याचे घावटे यांनी सांगितले.
advertisement
7/7
आतापर्यंत 5 टनापर्यंत मोसंबी विकल्या गेली आहे. आणखी 10 टन मोसंबी झाडांना आहे, त्याची काढणी झाल्यानंतर विकल्या जाईल आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळेल. सध्या सर्व शेतकरी 10 ते 12 फुटावर झाडांची लागवड करत आहे. मात्र, नवीन शेतकऱ्यांनी मोसंबी शेती करायची असल्यास 15 फुटावर मोसंबीची लागवड करावी. त्यामुळे फळ चांगलं येतं आणि नफाही चांगला मिळतो, असे शेतकरी सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: शेतकऱ्यानं केली शेतात 750 झाडांची लागवड, उत्पन्न मिळतेय लाखात, असं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल