TRENDING:

Kitchen Hacks : आठवडाभर वापरता येईल पुदिना, होणार नाही खराब! 'या' सोप्या ट्रिक्स वापरून साठवा

Last Updated:
How to keep mint fresh for long time : उन्हाळा सुरु झाला की घरात थंड पेयांची मागणी वाढते आणि बहुतांश थंड पेयांमध्ये पुदिना वापरलाच जातो. मग ते मसाला ताक असो, एखादं सरबत असो किंवा फळांचं मोजितो असो. या सर्वांमध्ये पुदिना लागतोच. पण हा पुदिना आठवडाभर साठवणं थोडं अवघड काम आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.
advertisement
1/7
आठवडाभर वापरता येईल पुदिना, होणार नाही खराब! 'या' सोप्या ट्रिक्स वापरून साठवा
पुदिना साठवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचसोबत काही चुका टाळल्यास तुम्ही बाजारातून आणलेला पुदिना आठवड्याभरानंतरही तितकाच फ्रेश राहू शकतो.
advertisement
2/7
पुदिना लवकर खराब होण्याचं महत्त्वाचं कारण ओलावा आणि साठवण्याची चुकीची पद्धत आहे. बाजारातून पुदिना आणून तो थेट फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळे पानांमध्ये ओलावा जमा होतो आणि तो लवकर सडतो. योग्यरित्या साठवल्यास पुदिना 20 ते 30 दिवस ताजा राहू शकतो आणि त्याची चव टिकवून ठेवू शकतो.
advertisement
3/7
गृहिणी संगीता यांनी सांगितलं की, आधी पुदिना व्यवस्थित स्वच्छ करा. खराब झालेली किंवा पिवळी पाने काढून टाका. नंतर एक मोठे भांडे पाण्याने भरा आणि त्यात पुदिना हलक्या हाताने धुवा. यामुळे घाण आणि धूळ सहज निघून जाते. स्वच्छ केल्यानंतर पुदिना चाळणीवर किंवा प्लेटवर पसरवा आणि थोडा वेळ सुकू द्या.
advertisement
4/7
आता पुदिना सुकल्यानंतर त्याचे लहान लहान गुच्छ तयार करा. नंतर स्वच्छ टिशू किंवा पेपर टॉवेल घ्या आणि त्यात पुदिना गुंडाळा. हे टिशू पानांमधील जास्तीचा ओलावा शोषून घेते आणि पुदिना बराच काळ ताजे ठेवते.
advertisement
5/7
टिशूमध्ये गुंडाळलेला पुदिना हवाबंद डब्यात किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. डब्यात जास्त हवा नसावी. नंतर तो फ्रिजच्या भाज्यांच्या सेक्शनमध्ये ठेवा. अशा प्रकारे साठवलेला पुदिना अनेक दिवस हिरवा आणि ताजा राहतो. तसेच त्याचा सुगंध टिकून राहतो.
advertisement
6/7
पुदिना साठवण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पुदिन्याचं देठ एक ग्लास पाण्यात फुलांसारखं उभं करा. आता हे प्लास्टिकच्या बागवे हलके झाकून फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीने पुदिना अनेक आठवडे ताजा राहू शकतो आणि गरज पडल्यास तुम्ही पाने सहजपणे तोडू शकता.
advertisement
7/7
ओला पुदिना कधीही थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. पानांवर जास्त पाणी असेल तर ते लवकर काळे होतील. तसेच कंटेनर उघडा आणि वेळोवेळी पाने तपासा. जर कोणतेही पान खराब झालेले दिसले तर ते ताबडतोब काढून टाका जेणेकरून उर्वरित पुदिना सुरक्षित राहील. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : आठवडाभर वापरता येईल पुदिना, होणार नाही खराब! 'या' सोप्या ट्रिक्स वापरून साठवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल