TRENDING:

वर्षाचा पहिला दिवस अन् 4 राशींचे भाग्य उजाडलं! प्रगतीचा मार्ग सापडला, हाती येणार पैसाच पैसा

Last Updated:
Astrology News :  आजपासून नव्या वर्षाला, म्हणजेच 2026 ला अधिकृत सुरुवात झाली आहे. प्रत्येक नवीन वर्षाबरोबर नव्या अपेक्षा, नवी स्वप्ने आणि नव्या संधी येत असतात.
advertisement
1/7
वर्षाचा पहिला दिवस अन् 4 राशींचे भाग्य उजाडलं! हाती येणार पैसाच पैसा
आजपासून नव्या वर्षाला, म्हणजेच 2026 ला अधिकृत सुरुवात झाली आहे. प्रत्येक नवीन वर्षाबरोबर नव्या अपेक्षा, नवी स्वप्ने आणि नव्या संधी येत असतात. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 2026 हे वर्ष विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. ग्रहांच्या हालचाली, त्यांचे संक्रमण आणि नक्षत्रांतील बदल यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर तसेच देश-विदेशातील घडामोडींवर होत असल्याचे मानले जाते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी होणारे सूर्याचे नक्षत्र संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे.
advertisement
2/7
ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी सूर्य पूर्वाषाढा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, सत्तास्थान आणि यशाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या नक्षत्र बदलाचा परिणाम विशेषतः तीव्र स्वरूपाचा असतो. या संक्रमणामुळे चार राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार असून, त्यांच्या अडचणी दूर होऊन प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
advertisement
3/7
वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण अत्यंत लाभदायक ठरणार आहे. गेल्या काही काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी चालून येतील. आर्थिक अडचणी कमी होतील आणि थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार, वाढता नफा आणि स्थैर्य अनुभवायला मिळेल. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल.
advertisement
4/7
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठीही सूर्याचे हे संक्रमण शुभ फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. काही जणांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची बातमी मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्याचे धाडस मिळेल. सामाजिक जीवनात नवीन ओळखी निर्माण होतील आणि मित्रपरिवार वाढेल. नशिबाची साथ लाभल्यामुळे आत्मविश्वास आणि मानसिक समाधान वाढेल.
advertisement
5/7
सिंह -  सूर्याचा स्वामित्व असलेल्या सिंह राशीवर या नक्षत्र संक्रमणाचा विशेष सकारात्मक प्रभाव पडणार आहे. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. व्यवसायात नफा, नवीन योजना आणि विस्ताराचे योग आहेत. नेतृत्वगुण अधिक ठळकपणे समोर येतील. काही जणांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य दिशा मिळेल आणि मेहनतीचे फळ मिळाल्याची जाणीव होईल.
advertisement
6/7
मीन - मीन राशीच्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. आर्थिक लाभाचे योग असून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी व शांत राहील. एखादी शुभ बातमी मिळाल्याने मानसिक समाधान मिळेल.
advertisement
7/7
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
वर्षाचा पहिला दिवस अन् 4 राशींचे भाग्य उजाडलं! प्रगतीचा मार्ग सापडला, हाती येणार पैसाच पैसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल