2025 संपताच बिग बी खास व्यक्तीच्या आठवणीत इमोशनल, KBC 17 च्या सेटवर केलं मन मोकळं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते अमिताभ बच्चन 2026च्या पहिल्या दिवशी इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी कोणतीही पोस्ट केलेली नाही तर KBC 17 च्या मंचावर आपलं मन मोकळं केलं.
advertisement
1/8

अभिनेते अमिताभ बच्चन वयाच्या 80व्या वर्षीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अमिताभ बच्चन हे असे अभिनेते आहेत जे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नव्या बदलांना आत्मसाद करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
advertisement
2/8
अमिताभ बच्चन ट्विटरवर खूप सक्रीय असतात. ते ब्लॉग्स लिहितात. अनेकदा त्यांचे रात्री अपरात्री येणाऱ्या पोस्ट चाहत्यांची झोप उडवतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ते अत्यंत भावुक झालेत.
advertisement
3/8
अमिताभ बच्चन अजूनही छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कौन बनेगा करोडपती हे होस्ट करत असतात. याच मंचावर बिग बी भावुक झालेत.
advertisement
4/8
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बिग बींचा व्हिडीओ पाहून चाहते देखील भावुक झालेत. बिग बी भावुक होण्यामागचं कारणही देखील तसंच होतं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
5/8
बिग बी दिवंगत अभिनेते आणि त्यांचे अत्यंत जवळचे मित्र धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झालेत. धर्मेंद्र यांचा इक्कीस हा शेवटचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या टीमशी बोलताना बिग बी भावुक झालेत.
advertisement
6/8
अमिताभ आणि धर्मेंद्र यांची मैत्री ही शोलेपासूनची आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ यांनाही मोठा धक्का बसला आहे. इक्कीस सिनेमाच्या निमित्तानं बिग बींना धर्मेंद्रंच्या आठणीत अश्रू अनावर झाले.
advertisement
7/8
धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, "इक्कीस हा सिनेमा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या सिनेमात अशा हिंदी सिनेमा जगतातील एक महान विभूती आपली शेवटची झलक त्यांच्या करोडो चाहत्यांसाठी सोडून गेली आहे. एक कलाकार आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कलेची सेवा करू इच्छितो, असंच काही केलं माझे आदर्श, माझं कुटुंब आणि माझे मित्र धर्मेंद्रजी."
advertisement
8/8
"धरम जी एक व्यक्ती नाही तर अनुभव होते आणि असा अनुभव जो कधीच मिटला जाऊ शकत नाही. तो आठवणी आणि आशीर्वाद बनून नेहमी सोबत असतो." हे बोलत असताना अमिताभ बच्चन इमोशनल झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2025 संपताच बिग बी खास व्यक्तीच्या आठवणीत इमोशनल, KBC 17 च्या सेटवर केलं मन मोकळं