आत्ताच थांबा! 'या' राशींच्या लोकांनी चुकूनही करू नका 'हे' काम, नाहीतर नवीन वर्षात होईल मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज 1 जानेवारी 2026, नवीन वर्षाचा पहिला दिवस. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि उत्साहात व्हावी. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अत्यंत संवेदनशील आहे.
advertisement
1/8

आज 1 जानेवारी 2026, नवीन वर्षाचा पहिला दिवस. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि उत्साहात व्हावी. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अत्यंत संवेदनशील आहे.
advertisement
2/8
आज 'चतुर्ग्रही योग' आणि सूर्याचे नक्षत्र संक्रमण होत असले तरी, काही ठराविक कामांमुळे तुमच्या राशीवर संकट ओढवू शकते. वास्तू आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, आज केलेल्या चुकांचे परिणाम तुम्हाला वर्षभर भोगावे लागू शकतात.
advertisement
3/8
सिंह आणि कुंभ - पैशांचे व्यवहार टाळा: आज वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कर्ज घेऊ नका. सिंह आणि कुंभ राशीवर शनीच्या ढैय्याचा आणि साडेसातीचा प्रभाव असल्याने, आज केलेले आर्थिक व्यवहार तुम्हाला वर्षभर 'कंगाल' ठेवू शकतात. आज दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
advertisement
4/8
वृश्चिक आणि मिथुन - वादांपासून दूर राहा: वृश्चिक राशीच्या जातकांनी आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाशीही वाद किंवा अपशब्द वापरणे टाळा. आज झालेला छोटासा वाद मोठ्या कायदेशीर कटकटीत रूपांतरित होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांनी जोडीदारासोबत वाद घालू नये, अन्यथा वर्षभर नात्यात दुरावा राहील.
advertisement
5/8
कुंभ - शॉर्टकट मारू नका: कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष आव्हानात्मक आहे. आज पैसे कमवण्यासाठी कोणत्याही शॉर्टकट किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. शॉर्टकटच्या नादात मोठे आर्थिक नुकसान आणि मानहानी होण्याची शक्यता आज दाट आहे.
advertisement
6/8
तामसिक भोजन आणि नशा टाळा: आज 'गुरु प्रदोष व्रत' देखील आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार टाळणे सर्व राशींसाठी हिताचे आहे. तामसिक अन्नामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि निर्णयांवर होतो.
advertisement
7/8
आळस आणि उशिरा उठणे: असे मानले जाते की वर्षाच्या पहिल्या दिवशी जो आळस करतो, त्याला वर्षभर संघर्षाचा सामना करावा लागतो. आज सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपून राहू नका. घरातील कोपरा नि कोपरा प्रकाशाने भरलेला ठेवा. अंधार आणि अस्वच्छता गरिबीला आमंत्रण देते.
advertisement
8/8
कर्क आणि मीन - आरोग्याकडे दुर्लक्ष नको: कर्क आणि मीन राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिना आरोग्यविषयक समस्या घेऊन येऊ शकतो. आज बाहेरचे किंवा अस्वच्छ अन्न खाणे टाळा. छोटीशी चूकही दवाखान्याच्या चकरा मारण्यास भाग पाडू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आत्ताच थांबा! 'या' राशींच्या लोकांनी चुकूनही करू नका 'हे' काम, नाहीतर नवीन वर्षात होईल मोठं नुकसान