TRENDING:

14 मार्चला रात्री 01 वाजून 01 मिनिटांनी पालटणार नशीब, 'या' राशींचे येणार सुखाचे दिवस; मनातल्या इच्छा होणार पूर्ण!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो, ज्याला 'संक्रांती' म्हटले जाते. 14 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 01 वाजून 01 मिनिटांनी सूर्य देव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
advertisement
1/7
14 मार्चला रात्री 01 वाजून 01 मिनिटांनी पालटणार नशीब, 'या' राशींचे येणार सुखाचे दिवस; मनातल्या इच्छा होणार पूर्ण!
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो, ज्याला 'संक्रांती' म्हटले जाते. 14 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 01 वाजून 01 मिनिटांनी सूर्य देव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्य या राशीत 14 एप्रिल 2026 च्या सकाळी 09 वाजून 31 मिनिटांपर्यंत विराजमान राहतील. सूर्याचं हे गोचर काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे.
advertisement
2/7
वृषभ - उत्पन्नात प्रचंड वाढ: सूर्याचे मीन राशीतील गोचर वृषभ राशीच्या अकराव्या भावात होत आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. नोकरीत पगारवाढ आणि व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
3/7
मिथुन - करिअरमध्ये नवी उंची: मिथुन राशीच्या दहाव्या भावात सूर्य विराजमान होणार आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळून पदोन्नतीचे योग जुळून येतील.
advertisement
4/7
कर्क - नशिबाची भक्कम साथ: कर्क राशीच्या नवव्या भावात सूर्याचे आगमन झाल्यामुळे तुमच्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ मिळेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. परदेश प्रवासाचे योग असून धार्मिक कार्यांत तुमची रुची वाढेल. वडिलांकडून किंवा गुरुतुल्य व्यक्तीकडून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
वृश्चिक - अचानक धनलाभ: वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे संक्रमण पंचम भावात होणार आहे. शिक्षण आणि प्रेमसंबंधासाठी हा काळ सुखद राहील. अचानक धनलाभाचे योग असून जुनी येणी वसूल होतील. मुलांच्या प्रगतीमुळे समाजात तुमचा मान वाढेल आणि मनातील इच्छा पूर्ण होईल.
advertisement
6/7
धनु - सुख-संपत्तीत वाढ: सूर्याचे हे गोचर तुमच्या चौथ्या भावात होणार आहे. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि आईकडून सहकार्य मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मानसिक शांतता लाभेल.
advertisement
7/7
कुंभ - वाणीचा प्रभाव आणि बँक बॅलन्स: तुमच्या दुसऱ्या भावात सूर्य प्रवेश करणार आहे. तुमची वाणी प्रभावी ठरेल, ज्यामुळे तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्याने तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक करू शकाल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
14 मार्चला रात्री 01 वाजून 01 मिनिटांनी पालटणार नशीब, 'या' राशींचे येणार सुखाचे दिवस; मनातल्या इच्छा होणार पूर्ण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल