TRENDING:

कॉमेडी केली आता मिस्ट्री,थ्रीलर सिनेमात दिसणार ओंकार भोजने; 'सालबर्डी'तील फर्स्ट लूक समोर

Last Updated:

'सालबर्डी; या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेत्री पूजा सावंत पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर आता ओंकार भोजने देखील सिनेमा असल्याचं सिनेमाच्या पोस्टरमधून समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता ओंकार भोजने मोठ्या पडद्यावरही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा जॉइन करण्याआधी त्याने काही सिनेमा आणि नाटकात काम केलं. ओंकार भोजने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी तो कॉमेडी नाही तर मिस्ट्री, थ्रीलर कथा असलेल्या सिनेमात दिसणार आहे. त्याच्या सिनेमातील पहिला लुक देखील समोर आला आहे.
News18
News18
advertisement

सालबर्डी या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेत्री पूजा सावंत पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर आता ओंकार भोजने देखील सिनेमा असल्याचं सिनेमाच्या पोस्टरमधून समोर आलं आहे.  महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या 'सालबर्डी' गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा सिनेमा आहे.

( पुण्यात Radio Jockey चा जॉब अन् अभिजित खांडकेकरची ती धक्कादायक सकाळ, ऐकून प्रार्थना बेहेरेही झाली शॉक, VIDEO )

advertisement

गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघे सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत.

आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दोघांच्या संवादांमधील चुरस, एकमेकांवरची टोलेबाजी आणि गावातील राजकारणातून निर्माण होणारे प्रसंग कथेला वेगळीच रंगत देणार आहेत.

advertisement

या भूमिकेविषयी बोलताना शशांक शेंडे म्हणाले, "सालबर्डीची कथा रहस्यमय आहे. स्थानिक पातळीवरचे राजकारण आणि एकमेकांसोबत असलेल्या नातेसंबंधांची झलक यामध्ये पहाता येईल. ही भूमिका करताना ओंकार सोबत झालेले ट्युनिंग आणि आम्ही साकारलेली भूमिका पडद्द्यावर पहाणं रंजक असणार आहे."

advertisement

ओंकार भोजने म्हणाला, "उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूप रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांना ही जुगलबंदी नक्कीच आवडेल."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, बिजली फुल शेतीमधून शेतकऱ्याचं नशीब पालटलं, लाखात कमाई
सर्व पहा

'सालबर्डी' सिनेमात अभिनेते शशांक शेंडे, ओंकार भोजने यांच्यासोबत पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  येत्या 17 एप्रिलला 'सालबर्डी' हा सिनेमा रिलीज होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
कॉमेडी केली आता मिस्ट्री,थ्रीलर सिनेमात दिसणार ओंकार भोजने; 'सालबर्डी'तील फर्स्ट लूक समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल