TRENDING:

जबरदस्त! आज 5 जानेवारीचा दिवस या राशींसाठी ठरणार गेमचेंजर, हाती अचानक पैसा येणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा वेगळा प्रभाव पडत असतो. आज सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी हा प्रभाव अधिक विशेष मानला जात आहे.
advertisement
1/7
आज 5 जानेवारीचा दिवस या राशींसाठी ठरणार गेमचेंजर, हाती अचानक पैसा येणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा वेगळा प्रभाव पडत असतो. आज सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी हा प्रभाव अधिक विशेष मानला जात आहे. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असल्याने या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा, अभिषेक आणि उपासना केल्यास विशेष फलप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. याचबरोबर, उद्याच्या दिवशी ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे काही राशींना विशेष लाभदायक योग जुळून येत आहेत. त्यामुळे कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा राहणार आहे, कोणत्या क्षेत्रात यश मिळू शकते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
2/7
मेष रास - मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ संकेत घेऊन येणार आहे. विशेषतः आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल जाणवतील. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित प्रश्न सुटण्याची किंवा त्यातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो, मात्र हा प्रवास सुखकर आणि फलदायी ठरेल. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याचा योग असून, देवपूजेमुळे मानसिक समाधान लाभेल.
advertisement
3/7
वृश्चिक रास - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विस्ताराच्या संधी निर्माण होतील. नवीन करार, प्रस्ताव किंवा भागीदारीतून फायदा होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो. सरकारी कामकाज, योजना किंवा कागदपत्रांशी संबंधित अडथळे दूर होतील. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
advertisement
4/7
कन्या रास कन्या राशीसाठी उद्याचा दिवस समाधानकारक आणि लाभदायक ठरणार आहे. मानसिक तणाव कमी होऊन मन स्थिर राहील. समाजातील मान्यवर व्यक्तींशी संपर्क वाढेल, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. नातेसंबंध अधिक दृढ होतील. नोकरदार वर्गातील लोकांना बढती, जबाबदारीत वाढ किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल असून अभ्यासात यश मिळू शकते.
advertisement
5/7
तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी उद्याचा दिवस अतिशय अनुकूल मानला जात आहे. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद लाभेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळी धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. उत्पन्नाचे मार्ग विस्तारतील आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.
advertisement
6/7
मकर रास मकर राशीसाठी उद्याचा दिवस यश आणि समाधान देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कला, सर्जनशीलता किंवा छंद यामध्ये प्रगती होईल. मित्रपरिवार आणि नातेवाईकांशी भेटीगाठी वाढून संबंध अधिक घट्ट होतील. एकूणच, हा दिवस आत्मिक शांती आणि प्रगतीचा ठरणार आहे.
advertisement
7/7
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
जबरदस्त! आज 5 जानेवारीचा दिवस या राशींसाठी ठरणार गेमचेंजर, हाती अचानक पैसा येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल