TRENDING:

Currency : तुम्ही कधी पाहिलीय का अडीच रुपयांची नोट? 'या' नोटीला का मिळतोय लाखोंचा भाव?

Last Updated:
आजच्या काळात आपण 10, 20, 100 आणि 500 च्या नोटा पाहतो. पण भारतीय चलनाच्या इतिहासात अशाही काही नोटा होत्या, ज्यांचा विचार आज आपण करू शकत नाही.
advertisement
1/7
तुम्ही कधी पाहिलीय का अडीच रुपयांची नोट? 'या' नोटीला का मिळतोय लाखोंचा भाव?
आपल्यापैकी अनेकांना लहानपणी सुटी नाणी किंवा नवीन नोटा साठवून ठेवण्याचा छंद असतो. कधी कपाटाच्या कोपऱ्यात तर कधी जुन्या डायरीमध्ये आपण हे पैसे जपून ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुमच्या संग्रहात असलेली एखादी जुनी नोट किंवा नाणे तुम्हाला एका रात्रीत लक्षाधीश बनवू शकते.
advertisement
2/7
आजच्या काळात आपण 10, 20, 100 आणि 500 च्या नोटा पाहतो. पण भारतीय चलनाच्या इतिहासात अशाही काही नोटा होत्या, ज्यांचा विचार आज आपण करू शकत नाही. अशीच एक दुर्मिळ नोट म्हणजे 'अडीच रुपयांची (2.5 रुपये) नोट'. ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण या नोटेची सध्या बाजारात मोठी चर्चा आहे.
advertisement
3/7
झारखंडमधील हजारीबाग येथे एक अशी गॅलरी आहे, जिथे भारतीय चलनाचा इतिहास जिवंत झालेला पाहायला मिळतो. या गॅलरीचे मालक जैन यांना जुनी नाणी आणि नोटा गोळा करण्याचा प्रचंड छंद आहे. त्यांच्या या संग्रहातील सर्वात अनमोल ठेवा म्हणजे ब्रिटिश काळातील अडीच रुपयांची नोट. या गॅलरीमुळे हे सिद्ध झाले आहे की, जर तुमच्याकडे योग्य पारख असेल, तर जुन्या नोटा तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवून देऊ शकतात.
advertisement
4/7
काय आहे या अडीच रुपयांच्या नोटेचा इतिहास? अनेकांना प्रश्न पडतो की अडीच रुपयांची नोट कधी चलनात होती?ब्रिटिश काळात भारतात 'आणा' प्रणाली चालत असे. तेव्हा 16 आणा म्हणजे 1 रुपया व्हायचा. त्याकाळी 40 आण्यांची किंमत 2.5 रुपये इतकी होती.
advertisement
5/7
छापाई आणि बंदी: ही नोट 1992 च्या दशकात छापली गेली होती. मात्र, ती फार कमी काळ चलनात राहिली आणि 1926 मध्ये ही नोट बंद करण्यात आली. यामुळेच आज ही नोट अत्यंत दुर्मिळ (Rare) मानली जाते. सध्याच्या लिलावामध्ये (Auctions) या अडीच रुपयांच्या नोटेची बोली तब्बल 6.40 लाख रुपयांपर्यंत लावली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ कागदाची नोट नसून ब्रिटिशकालीन आर्थिक इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे.
advertisement
6/7
या गॅलरीत केवळ ब्रिटिश-भारतीय नोटाच नाहीत, तर मुघल काळातील सोन्या-चांदीची नाणी, प्राचीन भारतीय चलन आणि स्वातंत्र्यानंतरची विशेष स्मारक नाणीदेखील आहेत. देशभरातील संग्राहक येथे मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या मते, ऑनलाइन मार्केटच्या तुलनेत येथे अस्सल आणि दर्जेदार वस्तू रास्त दरात मिळतात.
advertisement
7/7
एक रुपयाची नोट आणि 7 लाखांची कमाई?भारतात सध्या 'न्यूमिस्मॅटिक्स' (Numismatics - नाणी आणि चलनांचा अभ्यास) या विषयात रस वाढतोय. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जिथे साधी 1 रुपयाची जुनी नोट 7 लाखांपर्यंत विकली गेली आहे. तर '786' सारखे फॅन्सी नंबर असलेल्या नोटांची किंमत तर कोटींच्या घरात जाते. त्यामुळे, जर तुमच्याकडे किंवा तुमच्या पूर्वजांच्या संग्रहात अशा जुन्या नोटा असतील, तर त्या फेकून देऊ नका. त्यांची किंमत तपासा, कदाचित तुमच्याकडेही एखादा 'अनमोल ठेवा' दडलेला असू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Currency : तुम्ही कधी पाहिलीय का अडीच रुपयांची नोट? 'या' नोटीला का मिळतोय लाखोंचा भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल