TRENDING:

प्रीमिअरच्या आधीच फुटली 'बिग बॉस मराठी 6' च्या स्पर्धकांची नावं; सागर कारंडे नाही, तर 'हा' अभिनेता घालणार घरात राडा

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Contestants: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पर्वासाठी काही दिग्गज नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
1/9
प्रीमिअरच्या आधीच फुटली 'बिग बॉस मराठी 6' च्या स्पर्धकांची नावं
येत्या ११ जानेवारी २०२६ पासून रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर हा खेळ सुरू होणार असून, यंदा रितेश भाऊंच्या शब्दांचा फटका कोणाकोणाला बसणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/9
यंदाचं घर हे साधं-सुधं नसणार आहे. यावेळी 'स्वर्ग आणि नर्क' अशी थक्क करणारी थीम असणार आहे. एका बाजूला सुखाच्या सोयी आणि दुसरीकडे मात्र मरणप्राय संघर्ष. या नव्या संकल्पनेमुळे घरातील सदस्यांचे खरे चेहरे तर समोर येतीलच, पण मैत्री आणि गद्दारीची नवी समीकरणंही पाहायला मिळतील.
advertisement
3/9
जर तुम्ही टीव्हीसमोर बसू शकत नसाल, तर जिओ हॉटस्टारवर तुम्ही हे कधीही स्ट्रीम करू शकता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पर्वासाठी काही दिग्गज नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
4/9
१. सागर कारंडे: 'चला हवा येऊ द्या' मध्ये विविध पात्रांनी हसवणारा महाराष्ट्राचा लाडका सागर आता स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज झाला आहे. विनोदाचा बादशाह बिग बॉसच्या खेळात कसा टिकतो, हे पाहणं रंजक ठरेल.
advertisement
5/9
२. दीपाली सय्यद: केवळ नृत्यांगनाच नव्हे, तर आपल्या रोखठोक विधानांनी राजकारण आणि समाजकारण गाजवणाऱ्या दीपाली सय्यद यांची एन्ट्री यंदा नक्कीच धमाका करणार.
advertisement
6/9
३. अनुश्री माने: गाजलेल्या 'शाळा' वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेली अनुश्री यंदाच्या घरातील यंग फॅक्टर असणार आहे.
advertisement
7/9
४. संकेत पाठक: 'छत्रीवाली' फेम संकेत पाठकच्या रूपात घराला एक हॅण्डसम आणि लोकप्रिय अभिनेता मिळाला आहे.
advertisement
8/9
५. राधा मुंबईकर आणि रसिका जमसुतकर: या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींनीही यंदाच्या घराची वाट धरली असल्याचं समजतंय.
advertisement
9/9
मागच्या पर्वात 'झापूक झुपूक' म्हणत अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सुरज चव्हाणने बाजी मारली होती. साधेपणानेही शो जिंकता येतो, हे त्याने दाखवून दिलं. आता सुरजसारखंच प्रेक्षकांचं प्रेम मिळवून यंदाची ट्रॉफी कोण उचलणार, हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या इतर नावांवरूनही जोरदार चर्चा रंगली आहे, पण खरा पत्ता ११ जानेवारीलाच उघड होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रीमिअरच्या आधीच फुटली 'बिग बॉस मराठी 6' च्या स्पर्धकांची नावं; सागर कारंडे नाही, तर 'हा' अभिनेता घालणार घरात राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल