TRENDING:

सावधान! फेब्रुवारीमध्ये राहू-मंगळचा 'विस्फोटक' योग, मेषसह 'या' 2 राशींच्या लोकांना सोसावे लागणार हाल

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला मोठे महत्त्व असते. नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच ग्रहांची अशी एक युती होणार आहे, जी काही राशींसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते.
advertisement
1/7
राहू-मंगळचा 'विस्फोटक' योग, मेषसह 'या' 2 राशींच्या लोकांना सोसावे लागणार हाल
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला मोठे महत्त्व असते. नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच ग्रहांची अशी एक युती होणार आहे, जी काही राशींसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते.
advertisement
2/7
फेब्रुवारी 2026 मध्ये मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे आधीच मायावी ग्रह राहू विराजमान आहे. मंगळ आणि राहूच्या या एकत्र येण्यामुळे 'विस्फोटक' किंवा 'अंगारक' योग निर्माण होणार आहे.
advertisement
3/7
मंगळ हा अग्नी आणि क्रोधाचा कारक आहे, तर राहू हा भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणारा हा काळ कोणत्या राशींसाठी धोक्याचा ठरेल जाणून घेऊ.
advertisement
4/7
मेष - उत्पन्नात अडथळे: मेष राशीच्या लोकांसाठी हा योग 11 व्या भावात बनत आहे. या काळात आर्थिक लाभाच्या अपेक्षांना धक्का लागू शकतो. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत मोठा धोका पत्करू नका, अन्यथा नुकसान सोसावे लागेल.
advertisement
5/7
धनु - वादापासून दूर राहा: धनु राशीसाठी हा योग तिसऱ्या भावात होत आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण न ठेवल्यास जवळच्या व्यक्तींशी संबंध बिघडू शकतात. प्रवासादरम्यान अपघात किंवा सामानाची चोरी होण्याची भीती आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय कायदेशीर कचाट्यात अडकवू शकतात.
advertisement
6/7
मकर - आर्थिक आणि कौटुंबिक तणाव: मकर राशीच्या दुसऱ्या भावात हा विस्फोटक योग बनत आहे. अचानक मोठे खर्च समोर आल्याने आर्थिक नियोजन कोलमडू शकते. कुटुंबातील सदस्यांशी, विशेषतः भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कठोर शब्द वापरणे टाळावे.
advertisement
7/7
आरोग्यावर होणारा परिणाम: मंगळ आणि राहूच्या या युतीमुळे रक्तदाब, उष्णतेचे विकार आणि अपघातांचे प्रमाण वाढू शकते. ज्यांना आधीच हृदयाचे किंवा रक्ताशी संबंधित आजार आहेत, त्यांनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! फेब्रुवारीमध्ये राहू-मंगळचा 'विस्फोटक' योग, मेषसह 'या' 2 राशींच्या लोकांना सोसावे लागणार हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल