एकीकडे 35 हजार कोटींची संपत्ती आणि दुसरीकडे हा असा धक्कादायक निरोप; या घटनेने संपूर्ण कॉर्पोरेट जगतात हळहळ व्यक्त होत आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या या साम्राज्याच्या वारसाहक्कावर आहेत, शिवाय अग्निवेश यांच्या पत्नी आणि मुलांचं आता काय होणार यावर आहे. जे आतापर्यंत प्रसिद्धीच्या झोतात कधीच नव्हतं.
कोण होते अग्निवेश अग्रवाल?
advertisement
3 जून 1976 रोजी पटना येथे जन्मलेल्या अग्निवेश यांचे बालपण एका साध्या वातावरणात गेले. त्यांचे शिक्षण अजमेरच्या प्रसिद्ध मेयो कॉलेजमध्ये झाले. केवळ वडिलांच्या नावावर न राहता त्यांनी व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली होती. 'हिंदुस्तान झिंक'चे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती आणि 'फुजैराह गोल्ड' सारख्या कंपन्यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कामापेक्षाही त्यांच्या नम्र आणि संवेदनशील स्वभावाचे दाखले त्यांचे सहकारी देतात.
अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पूजा बांगुर यांची चर्चा सुरू झाली आहे. पूजा या स्वतः एका मोठ्या उद्योग घराण्यातील कन्या आहेत. त्या 'श्री सिमेंट'चे व्यवस्थापकीय संचालक हरि मोहन बांगुर यांची ती मुलगी आहे. जेव्हा या दोघांचे लग्न झाले, तेव्हा ती त्या काळातील सर्वात महागड्या विवाहांपैकी एक होतं.
इतकं मोठं कौटुंबिक पाठबळ असूनही पूजा बांगुर यांनी स्वतःला नेहमीच मीडिया आणि सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. आपल्या मुलांचे संगोपन आणि खाजगी आयुष्य त्यांनी अत्यंत गोपनीय ठेवले. आता अग्निवेश यांच्या जाण्यानंतर कुटुंबाची आणि त्यांच्या खाजगी गुंतवणुकीची जबाबदारी पूजा कशा प्रकारे सांभाळणार, याबाबत उद्योग वर्तुळात चर्चा आहे.
अनिल अग्रवाल यांची गणना आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. फोर्ब्सच्या 2025 च्या आकडेवारीनुसार, त्यांची एकूण संपत्ती साधारण 35,000 कोटी रुपये इतकी आहे. झिंक, कॉपर, ॲल्युमिनियम, वीज आणि तेलाच्या क्षेत्रात वेदांताचा दबदबा आहे. आता कंपनी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास सारख्या हाय-टेक क्षेत्रात पाऊल टाकत आहे.
अग्निवेश यांच्या निधनामुळे अनिल अग्रवाल यांनी आपला उजवा हात गमावला आहे. अशा वेळी कंपनीच्या भविष्यातील योजना आणि संपत्तीचे व्यवस्थापन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारच्या एका छोट्या गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आज एका कठीण वळणावर येऊन उभा राहिला आहे.
