TRENDING:

52 धावांमध्ये 6 विकेट, अर्धा संघ तंबूत, नंतर एकट्या ऋतुराजने 30 ओव्हर फोडून काढलं, खतरनाक रेकॉर्ड

Last Updated:
महाराष्ट्र संघाची ही अवस्था पाहता अख्खा संघ तंबूत परतेल असे वाटत होते. पण त्याचवेळी कर्णधार ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राचा डाव सावरून भली मोठी धावसंख्या उभारली आहे.
advertisement
1/7
52 धावांमध्ये 6 विकेट, अर्धा संघ तंबूत, नंतर एकट्या ऋतुराजने 30 ओव्हर फोडून काढल
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडतायत. आज गोवा विरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचे 52 धावांमध्ये 6 विकेट पडले होते.
advertisement
2/7
महाराष्ट्र संघाची ही अवस्था पाहता अख्खा संघ तंबूत परतेल असे वाटत होते. पण त्याचवेळी कर्णधार ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राचा डाव सावरून भली मोठी धावसंख्या उभारली आहे.
advertisement
3/7
खरं तर महाराष्ट्र संघाते 20 ओव्हरमध्ये 52 धावांमध्ये 6 विकेट पडले होते.इथून पुढे संघ 100 धावात ऑल आऊट होईल असे वाटत होते. पण ऋतुराजने महाराष्ट्राचा डाव सावरत नाबाद 134 धावांची शतकीय खेळी केली.
advertisement
4/7
ऋतुराज गायकवाडने 134 बॉल 131 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 102 इतका होता.
advertisement
5/7
त्याला विकी ओस्टवालने 53 तर राजवर्धन हंगेकरने 32 धावांची साथ दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 249 धावा केल्या होत्या.
advertisement
6/7
ऋतुराजने या धावा करून एक रेकॉर्ड देखील केला आहे. ऋतुराज 57 डावात 15 सेंच्यूरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऋतुराज इतक्याच सेंच्यूरी करणारा अंकित बावणे दुसऱ्या स्थानी आहे, त्याने यासाठी 94 सामने खेळले होते. देवदत्त या क्रमवारीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी मयंक अग्रवाल आहे.
advertisement
7/7
दरम्यान गोवा या 249 धावांचा पाठलाग करताना 9 विकेट गमावून 244 धावा करू शकली होती. त्यामुळे महाराष्ट्र संघाने हा सामना 5 विकेटने जिंकला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
52 धावांमध्ये 6 विकेट, अर्धा संघ तंबूत, नंतर एकट्या ऋतुराजने 30 ओव्हर फोडून काढलं, खतरनाक रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल