Summer Tips : गोड आणि जास्त पाणी असलेलं शहाळ कसं निवडावं? 'या' सोप्या ट्रिक्सने चटकन कळेल..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to choose sweet water rich coconut : उन्हाळ्यात नारळपाणी म्हणजेच शहाळं पिणं आपल्या आरोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात आता मोठया प्रमाणावर शहाळे दाखलाही झाले आहेत. पण जास्त पाणी असलेलं गोड शहाळं कसं निवडावं? आज यासाठीच आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत.
advertisement
1/7

नारळपाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहाते आणि उन्हाळ्यात जे लोक बाहेर प्रवास करतात, त्यांच्यासाठी तर नारळपाणी उत्तम पर्याय आहे. इतर थंड पेयांपेक्षा नारळपाणी निश्चितच हेल्दी पर्याय आहे. चला पाहूया चांगलं शहाळं कसं निवडावं.
advertisement
2/7
सर्वात आधी शहाळ्याचं रंग पाहा. गडद हिरवा किंवा हलका पिवळा रंग असलेलं शहाळं सर्वोत्तम आहे. ज्या शहाळ्यावर गडद तपकिरी किंवा जास्त डाग असतील ते शहाळं घेणं टाळा. कारण ते जुनं असू शकतं.
advertisement
3/7
त्यानंतर तुम्ही शहाळ्याच्या आवाजावरूनही ते फ्रेश आहे की नाही आणि त्यात किती पाणी आहे, हे तपासू शकता. शहाळं तुमच्या कानाजवळ घेऊन ते हलवा. पाण्याचा थेंब पडल्यासारखा आवाज आला तर समजून जा, शहाळं पाण्याने भरलेलं आहे.
advertisement
4/7
शहाळं गोड आहे की नाही हे तपासणंही सोपं आहे. शहाळ्यावर तीन गोलाकार खुणा असतात, त्यांना नारळाचे डोळेही म्हणतात. याला हलके दाबून तपासा. ते ओले किंवा थोडे मऊ वाटत असतील तर शहाळ्यात जास्त गोड पाणी आहे.
advertisement
5/7
यानंतर येतो आकार आणि वजन. शहाळ्याच्या आकारावरून तुम्ही त्यामध्ये किती पाणी असेल याचा अंदाज लावू शकता. आकाराबद्दल बोलायचं तर, गोल शहाळ्याऐवजी शंखूच्या आकाराचं शहाळं निवडा. कारण यात कमी क्रीम आणि जास्त पाणी असतं असं म्हणतात.
advertisement
6/7
शहाळ्याचं वजनही तपासा. साहजिकच तुम्ही नेहमी जड शहाळं निवडायला हवं. शहाळं वजनाला हलकं असेल, त्यातलं पाणी सुकलेलं असू शकतं. म्हणजेच त्यात कमी पाणी असण्याची शक्यता असते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : गोड आणि जास्त पाणी असलेलं शहाळ कसं निवडावं? 'या' सोप्या ट्रिक्सने चटकन कळेल..