Kavya Maran : काव्या मारनने केली घोडचूक, 'अलिखित' नियम मोडला, IPL मध्ये धक्का बसणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण या सामन्याआधीच हैदराबादची टीम अडचणीत सापडली आहे.
advertisement
1/7

सनरायजर्स हैदराबादच्या टीमची मालकी सन ग्रुपकडे आहे. या ग्रुपचं नेतृत्व कलानिथी मारन आणि त्यांची मुलगी, सीईओ काव्या मारनकडे आहे. आयपीएल ऑक्शन असो किंवा सनरायजर्स हैदराबादचे सामने काव्या मारन नेहमीच टीमला सपोर्ट करण्यासाठी उतरते.
advertisement
2/7
सनरायजर्स हैदराबादची मालकिण काव्या मारन यांचा चाहता वर्गही मोठा आहे. आयपीएलमध्ये काव्याचे स्टेडियममधले फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. पण आता काव्या मारनने मोठी चूक केली आहे.
advertisement
3/7
इंग्लंडच्या द हंड्रेड या स्पर्धेत काव्याने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं आहे. द हंड्रेडच्या लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला विकत घेण्यासाठी काव्याने मोठी बोली लावली. काव्याच्या टीमने अबरारला 1,90,000 पाऊंड (अंदाजे 2.64 कोटी रुपये) देऊन विकत घेतलं.
advertisement
4/7
पाकिस्तानचे खेळाडू हे फक्त 2008 सालच्या पहिल्याच आयपीएलमध्ये खेळले होते. त्यानंतर मुंबईवर 26/11 हल्ला झाला आणि पाकिस्तानी खेळाडूंची आयपीएलमधून हकालपट्टी झाली, त्यामुळे अजूनही पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकत नाहीत.
advertisement
5/7
द हंड्रेडमधल्या बऱ्याच टीमही आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकीच्या आहेत, त्यामुळे द हंड्रेडच्या लिलावातही पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नाही, असं बोललं जात होतं.
advertisement
6/7
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मात्र सर्वसमावेशकतेचं धोरण अवलंबलं जाईल आणि कुणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता काव्याने पाकिस्तानी खेळाडू अबरारला टीममध्ये घेतलं.
advertisement
7/7
पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्यामुळे सनरायजर्स हैदराबादवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. आयपीएलच्या तोंडावर सनरायजर्सने पाकिस्तानी खेळाडूसाठी बोली लावल्यामुळे याचे पडसाद सनरायजर्स हैदराबादच्या सामन्यांवर उमटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Kavya Maran : काव्या मारनने केली घोडचूक, 'अलिखित' नियम मोडला, IPL मध्ये धक्का बसणार!