'माझ्या मुलाने स्वतःच्या स्वार्थासाठी...', लग्न होताच मोनालिसाला मोठा धक्का, फरमानच्या वडिलांचा लेकावर संताप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Monalisa Bhosle Marriage: मोनालिसाचे सासरे आणि फरमानचे वडील चौधरी जाफर अली यांनी या लग्नावर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
1/8

महाकुंभातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मोनालिसा आता तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. महाकुंभमध्ये हार विकताना जिचा फोटो व्हायरल झाला, ती मोनालिसा आता चक्क खान घराची सून झाली आहे.
advertisement
2/8
लग्नानंतर मोनालिसा आणि तिचा पती फरमान खान यांनी मीडियासमोर येत त्यांचे लग्न लव्ह जिहादचा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर ते लग्नानंतर धर्म बदलणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मोनालिसाचे सासरे आणि फरमानचे वडील चौधरी जाफर अली यांनी या लग्नावर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
3/8
फरमानचे वडील जाफर अली सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. टीव्हीवर आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी पाहिल्यापासून त्यांना रात्रभर झोप लागलेली नाही.
advertisement
4/8
एका मुलाखतीत ते म्हणाले, "फरमान वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळी घरी येतो. १५ दिवसांपूर्वी माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं, पण त्याने लग्नाचा अवाक्षरही काढला नाही. तो त्या मुलीसोबत चित्रपटात काम करतोय एवढंच मला ठाऊक होतं. पण तो थेट लग्नच करेल असं वाटलं नव्हतं."
advertisement
5/8
त्यांनी दोघांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "आम्ही आमच्या मुलाचं लग्न आमच्याच धर्मात लावून दिलं असतं. उद्या या दोघांना मुलं होतील, तेव्हा समाज विचारेल ही मुलं कोणत्या धर्माची आहेत, त्यांच्या लग्नाचं काय होणार. माझ्या मुलाने स्वतःच्या स्वार्थासाठी अख्ख्या कुटुंबाला अडचणीत आणलं आहे."
advertisement
6/8
दरम्यान, फरमानच्या वडिलांनी त्याच्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत. फरमान आणि मोनालिसा यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेत जाफर अली म्हणाले, "फरमानने माझ्या मर्जीविरुद्ध हे पाऊल उचललं आहे. जर तो त्या मुलीला घेऊन घरी आला, तर मी त्याला घरात घुसू देणार नाही. माझ्यासाठी तो परका झाला आहे."
advertisement
7/8
केवळ सासरच नाही, तर मोनालिसाच्या माहेरचे लोकही या लग्नामुळे दुखावले गेले आहेत. मोनालिसाच्या वडिलांनी तर या लग्नाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. या लग्नाला अनेकांनी 'लव्ह जिहाद' किंवा 'केरळ स्टोरी ३' असं नाव दिलं. पण मोनालिसाने प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं की, घरचे तिचं लग्न जबरदस्तीने आत्याच्या मुलाशी लावून देत होते, म्हणून तिने पळून जाऊन हे लग्न केलं.
advertisement
8/8
एकीकडे मोनालिसा आणि फरमान केरळमध्ये आपलं नवीन आयुष्य सुरू करण्याची स्वप्नं पाहत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे दोन्ही परिवार या नात्याला काळिमा मानत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्या मुलाने स्वतःच्या स्वार्थासाठी...', लग्न होताच मोनालिसाला मोठा धक्का, फरमानच्या वडिलांचा लेकावर संताप