टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना फार विश्रांती मिळणार नाही, कारण 28 मार्च पासून आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होत आहे. 31 मे रोजी आयपीएल फायनल होईल, त्यानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरेल. आयपीएल संपल्यानंतर भारतीय टीमचे जून ते डिसेंबर या कालावधीत व्यस्त वेळापत्रक असेल. जूनमध्ये, अफगाणिस्तान टीम एक टेस्ट आणि तीन वनडे सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा करेल. त्यानंतर, जुलैमध्ये, टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करेल, जिथे दोन्ही टीम पाच टी-20 आंतरराष्ट्रीय आणि तीन वनडे सामने खेळतील.
advertisement
यानंतर, ऑगस्टमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. जर सरकारची परवानगी मिळाली तर भारतीय टीम सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करू शकते, जिथे दोन्ही टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळतील. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तटस्थ ठिकाणी तीन टी-20 सामने खेळले जातील.
त्यानंतर वेस्ट इंडिज तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा करेल. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणार आहेत, जिथे भारतीय क्रिकेट टीम देखील सहभागी होईल. भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा देखील करेल, जिथे तिन्ही फॉरमॅटमध्ये सीरिज खेळवली जाईल. या वर्षाच्या अखेरीस, श्रीलंकेची टीम वनडे आणि टी-20 सीरिजसाठी भारताचा दौरा करेल.
अफगाणिस्तानचा भारत दौरा (जून)
टेस्ट मॅच : 6 जूनपासून, न्यू चंदीगड, सकाळी 9.30 वाजता
पहिला वनडे - 14 जून, धर्मशाला, दुपारी 1.30 वाजता\
दुसरी वनडे - 17 जून, लखनऊ, दुपारी 1.30 वाजता
तिसरी वनडे - 20 जून, चेन्नई, दुपारी 1.30 वाजता
भारताचा इंग्लंड दौरा (जुलै)
1 जुलै: पहिली टी-20, चेस्टर-ले-स्ट्रीट
4 जुलै: दुसरी टी-20, मँचेस्टर
7 जुलै: तिसरी टी-20, नॉटिंगहॅम
9 जुलै: चौथी टी-20, ब्रिस्टल
11 जुलै: पाचवी टी-20, साउथहॅम्प्टन
14 जुलै: पहिली वनडे, बर्मिंगहॅम
16 जुलै: दुसरी वनडे, कार्डिफ
19 जुलै: तिसरी वनडे, लॉर्ड्स
भारताचा श्रीलंका दौरा (ऑगस्ट)
2 टेस्ट मॅच
भारताचा बांगलादेश दौरा (सरकारची परवानगी मिळाली तर)
3 वनडे मॅच (1, 3 आणि 6 सप्टेंबर)
3 टी-20 सामने (9, 12 आणि 13 सप्टेंबर)
भारताचा अफगाणिस्तान दौरा (तटस्थ ठिकाण) | सप्टेंबर-ऑक्टोबर
3 टी-20 मॅच
वेस्ट इंडिजचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर)
3 वनडे सामने
5 टी-20 सामने
एशियन गेम्स 2026
यजमान: जपान
भारताचा न्यूझीलंड दौरा (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
2 टेस्ट मॅच
5 वनडे मॅच
5 टी-20 मॅच
श्रीलंकेचा भारत दौरा (डिसेंबर)
3 वनडे मॅच
3 टी-20 मॅच
