TRENDING:

भोळ्या चेहऱ्यामागे लपलाय 'मास्टरमाइंड', 'या' मुलांकांचे लोक असतात मिस्टीरियस; चुकूनही ठेवू नका विश्वास!

Last Updated:
काही लोक दिसायला अत्यंत साधे, शांत आणि निरागस असतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचे मन अत्यंत मिस्टीरियस आणि चतुर असते.
advertisement
1/7
भोळ्या चेहऱ्यामागे लपलाय 'मास्टरमाइंड', 'या' मुलांकांचे लोक असतात मिस्टीरियस; चुकूनही ठेवू नका विश्वास!
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख केवळ तिचे भविष्यच नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक छुपे पैलू देखील उघड करते. काही लोक दिसायला अत्यंत साधे, शांत आणि निरागस असतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचे मन अत्यंत मिस्टीरियस आणि चतुर असते. अशा व्यक्तींना समजून घेणे सोपे नसते.
advertisement
2/7
विशेषतः हे 3 मूलांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे म्हटले जाते की, त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता पाहून त्यांच्या स्वभावाचा अंदाज लावणे कठीण असते. त्यांच्या या 'गुढ' स्वभावामागे एक तीक्ष्ण आणि प्रसंगी धोकादायक ठरू शकणारे थॉटप्रोसेस सुरू असते.
advertisement
3/7
मूलांक 4: ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. या व्यक्ती दिसायला अतिशय साध्या वाटतात, पण राहूच्या प्रभावामुळे त्यांचा स्वभाव 'चंचल' असतो. ते नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करतात. कोणालाही कळू न देता आपला हेतू कसा साध्य करायचा, यात ते माहीर असतात.
advertisement
4/7
मूलांक 7: ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झालेला आहे, त्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. या व्यक्ती अत्यंत शांत आणि अंतर्मुख दिसतात. मात्र, त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा पत्ता कोणालाही लागत नाही. ते उत्कृष्ट निरीक्षक असतात आणि समोरच्या व्यक्तीची कमजोरी ओळखून आपला डाव आखण्यात पटाईत असतात.
advertisement
5/7
मूलांक 8: कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक खूपच गंभीर आणि निरागस वाटू शकतात. मात्र, शनीच्या प्रभावामुळे ते अत्यंत संयमी आणि 'मास्टर प्लॅनर' असतात. जर कोणी त्यांच्या मार्गात अडथळा आणला, तर ते अतिशय शांतपणे आणि योग्य वेळेची वाट पाहून आपला बदला घेतात.
advertisement
6/7
गोड बोलून काम काढण्याची कला: या लोकांकडे शब्दांचे जाळे विणण्याची अद्भुत कला असते. ते समोरच्या व्यक्तीशी इतक्या गोडपणे बोलतात की कोणालाही संशय येत नाही. मात्र, त्या गोड शब्दांमागे स्वतःचा फायदा किंवा एखादी मोठी रणनीती लपलेली असू शकते.
advertisement
7/7
कठोर निर्णय घेण्याची क्षमता: दिसायला हे लोक हळवे वाटले तरी, वेळ पडल्यास ते अत्यंत कठोर आणि व्यावहारिक निर्णय घेतात. स्वार्थासाठी किंवा आपल्या ध्येयासाठी ते नात्यांचा विचार बाजूला सारू शकतात. त्यांची ही 'प्रॅक्टिकल' वृत्ती अनेकदा इतरांना चकित करते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
भोळ्या चेहऱ्यामागे लपलाय 'मास्टरमाइंड', 'या' मुलांकांचे लोक असतात मिस्टीरियस; चुकूनही ठेवू नका विश्वास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल