मिळालेल्या माहितीनुसार,मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात वाहतूक पोलीस निरीक्षक किरण सहाणे हे आज अमर पॅलेस येथे ड्यूटीवर होते.या दरम्यान दुचाकीने आलेल्या काही तरूणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
[video width="848" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-12-at-10.19.03-PM-2026-03-bff5fbf7a1f712c549c2bd68f77fd831.mp4"][/video]
व्हिडिओमध्ये या घटनेदरम्यान अनेक जण जमल्याचे आणि मारहाण होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी वाहतूक कर्मचारी नम्रता मिनोजी या बाजूला उभ्या असल्याचेही दिसून येते.तर काही तरूण किरण सहाने यांना मारहाण करताना दिसत आहे.विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणावर गाड्या देखील रस्त्यावर उभ्या होत्या. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण मारहाणीत जखमी झालेले वाहतूक पोलीस निरीक्षक किरण सहाणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
दरम्यान या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.
