TRENDING:

'एक एक करून सगळे...', अमिताभ बच्चन यांना पुन्हा मोठा झटका! धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एका जिवलग मित्राचं निधन

Last Updated:
Amitabh Bachchan: अमिताभजी गेल्या काही काळापासून एकाकी आणि दुःखी दिसत आहेत. केबीसीचा सेट गाजवणारे अमिताभ सध्या काही वैयक्तिक दुःखांशी झुंज देत असल्याचं त्यांच्या फॅन्सच्या निदर्शनास आलं आहे.
advertisement
1/8
'एक एक करून सगळे...', अमिताभ बच्चन यांना पुन्हा मोठा झटका!
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एनर्जी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे. ऐंशी ओलांडल्यानंतरही ते सातत्याने काम करताना दिसतात. लवकरच त्यांचे काही बहुप्रतिक्षित सिनेमे रिलीज होण्याच्या तयारीत आहेत.
advertisement
2/8
मात्र असे असतानाही, अमिताभजी गेल्या काही काळापासून एकाकी आणि दुःखी दिसत आहेत. केबीसीचा सेट गाजवणारे अमिताभ सध्या काही वैयक्तिक दुःखांशी झुंज देत असल्याचं त्यांच्या फॅन्सच्या निदर्शनास आलं आहे.
advertisement
3/8
नुकतेच बिग बींच्या अत्यंत जवळच्या जिवलग मित्राचे निधन झाले असून, या धक्क्यातून सावरणे त्यांना कठीण जात असल्याचे त्यांच्या ताज्या ब्लॉगवरून स्पष्ट झाले आहे.
advertisement
4/8
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या मनातील भावना त्यांच्या ब्लॉगमधून व्यक्त करतात. नुकतेच त्यांनी एक अत्यंत भावूक नोट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या जिवलग मित्राच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
5/8
अमिताभ यांनी लिहिले, "मी आज माझा आणखी एक अत्यंत लाडका मित्र गमावला आहे... तो प्रचंड प्रेमळ आणि नेहमी हसतमुख असायचा. कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कसब त्याच्याकडे होते आणि चेहऱ्यावरचे हसू त्याने कधीच कमी होऊ दिले नाही. आज तो गेला आहे यावर विश्वासच बसवत नाही आहे... एक एक करून सगळे सोडून जात आहेत."
advertisement
6/8
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशाला हादरवणारी बातमी आली. सर्वांचे लाडके धर्मेंद्र यांचे निधन झाले. अमिताभ आणि धर्मेंद्र हे अत्यंत जवळचे मित्र होते. 'शोले'मधील ही जय-वीरूची जोडी खऱ्या आयुष्यातही तितकीच घट्ट होती.
advertisement
7/8
धर्मेंद्र यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन आधीच कोलमडले होते. त्या धक्क्यातून सावरत असतानाच, आता आणखी एका जवळच्या मित्राच्या एक्झिटने महानायक खचले आहेत. त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी पाहून चाहत्यांनाही भावूक करून गेली आहे.
advertisement
8/8
अमिताभ यांनी नुकतेच 'कल्कि २८९८ एडी' या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र २' सारखे मोठे प्रोजेक्ट्स देखील त्यांच्याकडे आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ यांना धीर दिला असून, त्यांच्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'एक एक करून सगळे...', अमिताभ बच्चन यांना पुन्हा मोठा झटका! धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एका जिवलग मित्राचं निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल