TRENDING:

Numerology: पैशांची चिंता मिटणार! शुक्रवारचा दिवस 3 मूलांकाना भाग्याचा, साक्षात धनलक्ष्मी प्रसन्न

Last Updated:

Numerology: शुक्रवारचा दिवस काही मूलांकासाठी जागरूकतेचा संकेत देत आहे. काहींना मोठे यश, सन्मान किंवा वाढीव उत्पन्नाचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे गुंतवणूक आणि करिअरसाठी हा काळ चांगला आहे. काहींना सामाजिक संपर्क आणि हुशारीचा फायदा होईल, तरीही पैशांचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले दैनिक 1 ते 9 मूलांकाचे अंकज्योतिष जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

आज तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील आणि तुम्ही ठरवलेली ध्येय गाठू शकाल. विनाकारण होणारे वाद टाळलेलेच बरे. जर त्वचेची काही समस्या जाणवली, तर चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत आज थोडी चिंता वाटू शकते. तुमचा लकी नंबर 5 आणि लकी कलर लॅव्हेंडर आहे.

advertisement

अंक 2 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)

तुमची सामाजिक प्रतिमा आणि लोकांशी असलेले संपर्क तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळवून देतील. आज तुम्हाला बाहेर जेवण्याची ओढ लागेल. जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. खर्च वाढल्यामुळे तुम्हाला पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागेल. डोळे उघडे ठेवा, कारण आज तुमची भेट अशा व्यक्तीशी होऊ शकते जिच्यासोबत तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य घालवू शकाल. तुमचा लकी नंबर 9 आणि लकी कलर मरून आहे.

advertisement

अंक 3 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे)

तुमच्या नशिबात आज अचानक बदल घडून येईल. दिवसभर थोडा थकवा जाणवू शकतो. बोलताना संयम ठेवा आणि नको त्या वादात पडू नका. कामाच्या ठिकाणी तुमची पकड मजबूत असेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. आज तुमचे मन रोमँटिक मूडमध्ये असेल. तुमचा लकी नंबर 7 आणि लकी कलर लेमन आहे.

advertisement

अंक 4 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे)

मित्र आणि नातेवाईकांशी थोडे प्रेमाने वागा. आज तुम्ही खूप बिनधास्त मूडमध्ये असाल. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला खूप फिट वाटेल, त्यामुळे एखादा नवीन फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. तुमच्या तल्लख बुद्धीमुळे व्यवसायातील अडचणी तुम्ही सहज सोडवू शकाल. जोडीदारासोबत थोडे खटके उडू शकतात, पण वेळ दिल्यास गोष्टी आपोआप सुधारतील. तुमचा लकी नंबर 5 आणि लकी कलर सी ग्रीन आहे.

advertisement

महिनाभर अग्नीपासून जपा, विषबाधेचा धोका; मीन संक्रातीनंतर 5 राशींना अलर्ट

अंक 5 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे)

आज घरगुती शांतता थोडी भंग पावण्याची शक्यता आहे. मुलांकडून तुम्हाला एखादा धक्कादायक अनुभव येऊ शकतो. ताप आल्यासारखे वाटू शकते, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि उबदार कपडे वापरा. खर्च अचानक वाढल्यामुळे तुम्हाला बचतीमधील पैसे वापरावे लागतील. जोडीदारासोबतचे तुमचे नाते मात्र खूप चांगले राहील. तुमचा लकी नंबर 2 आणि लकी कलर नारंगी आहे.

अंक 6 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे)

सध्या तुम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर असाल. तरीही आज मनामध्ये थोडी भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते. मानसिक ताण वाढल्यामुळे शारीरिक ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटेल. कामाच्या ठिकाणी काही विलंब किंवा निराशेचा सामना करावा लागू शकतो. वैयक्तिक आयुष्यात मात्र भावनिक सुसंवाद आणि शांतता लाभेल. तुमचा लकी नंबर 22 आणि लकी कलर व्हायोलेट आहे.

अंक 7 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे)

एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमचा चुकीचा अर्थ काढू शकते, त्यामुळे सावध राहा. आज तुम्ही काळजीमुक्त असाल. शारीरिक आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायातील स्पर्धकांवर मात करण्यासाठी तुम्ही आज कशाचीही पर्वा करणार नाही. आजची संध्याकाळ प्रेमळ आठवणी बनवण्यासाठी खूप चांगली आहे. तुमचा लकी नंबर 3 आणि लकी कलर मॅजेंटा आहे.

अंक 8 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे)

एखादी प्रभावशाली व्यक्ती आज तुम्हाला मदतीचा हात देईल. आज तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याची आणि जेवण्याची इच्छा होईल. उत्तम आरोग्यामुळे तुमचा उत्साह दांडगा असेल. वाढलेल्या उत्पन्नामुळे तुमची जीवनशैली सुधारेल. जोडीदार तुमच्या शारीरिक गरजांसोबतच भावनिक आणि बौद्धिक गरजाही पूर्ण करेल. तुमचा लकी नंबर 5 आणि लकी कलर बॉटल ग्रीन आहे.

सच्चा दोस्त तोच! या 4 बर्थडेट असणारे लोक अडचणीत पाठीशी उभे राहतात

अंक 9 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला प्रयोग?
सर्व पहा

आज तुम्हाला प्रसिद्धी आणि सन्मान मिळेल. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. परिस्थिती कशीही असली तरी आज निर्भयपणे वागण्याचा दिवस आहे. उत्पन्नात मोठी वाढ झाल्यामुळे आज स्वतःसाठी काहीतरी खरेदी करण्याची हीच वेळ आहे. जोडीदाराच्या आरोग्यामुळे आज थोडे चिंतेचे क्षण येऊ शकतात. तुमचा लकी नंबर 4 आणि लकी कलर इलेक्ट्रिक ब्लू आहे.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: पैशांची चिंता मिटणार! शुक्रवारचा दिवस 3 मूलांकाना भाग्याचा, साक्षात धनलक्ष्मी प्रसन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल