TRENDING:

Shirdi: युद्धामुळे गॅसचा तुटवडा, पण शिर्डीत भक्तांची पंगत सुरूच; साई मंदिराचा अद्भूत चमत्कार

Last Updated:

साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील  पंगत गॅस टंचाईमुळे थांबणार नाही ती सुरूच राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिर्डी: पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा भारतात देखील बसू लागल्या आहे. देशात सध्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवू लागला असून याचा थेट फटका राज्यातील अनेक मोठ्या मंदिरांच्या अन्नछत्रांना बसला आहे. काही ठिकाणी भाविकांचा प्रसाद बंद करण्याची वेळ आली असली तरी, शिर्डीतील साईबाबा संस्थानने मात्र या संकटावर मात केली आहे. साईबाबा संस्थानच्या सुप्रसिद्ध प्रसादालयातील  पंगत गॅस टंचाईमुळे थांबणार नाही, कारण सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करत दररोज हजारो भाविकांच्या भोजनाची सोय करण्यात येणार आहे.
News18
News18
advertisement

साईबाबा संस्थानने 2009 साली प्रसादालयात अन्न शिजवण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा यंत्रणांपैकी एक प्रकल्प बसविला आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून, पुढील 15 दिवसांत ही टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हेच ओळखून संस्थानने या यंत्रणेची सुरू असलेली देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने थांबवून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. या सौर ऊर्जेच्या माध्यमातून दररोज पाच टन भात आणि डाळ शिजवली जात असून, दररोज सुमारे 200 किलो एलपीजी गॅसची मोठी बचत होत आहे.

advertisement

काय आहे नियोजन?

साई प्रसादालयात दररोज 35 ते 40 हजार भाविक भोजन करतात, तर उत्सवाच्या काळात ही संख्या 50 हजारांच्या पार जाते. संपूर्ण प्रसादालयासाठी दररोज सुमारे 2 टन गॅसची गरज भासते. गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर आगामी 'श्रीरामनवमी' उत्सवात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या गर्दीत भाविकांना भोजन मिळावे यासाठी संस्थानला लाडू आणि बुंदीची निर्मिती बंद करावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जास्तीत जास्त भाविकांना भोजन देता यावे यासाठी चपाती आणि वरण यामध्ये काही बदल करून नियोजन केले जाणार आहे.

advertisement

अन्नछत्र सुरूच राहणार

युद्धाच्या परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यात मर्यादा आल्या आहेत. तरीही, साई संस्थानाकडून भाविकांच्या प्रसादात खंड पडू नये यासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे गॅस टंचाई असतानाही शिर्डीत साई भक्तांना अन्नप्रसादाचा लाभ मिळत राहणार आहे.

नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण

शहरातील हॉटेल व्यवसायापाठोपाठ आता आयटी क्षेत्रालाही या टंचाईचा फटका बसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुरवठा कधी सुरळीत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरगुती गॅसच्या दरात व पुरवठ्याच्या कालावधीतही वाढ करण्यात आली आहे.  कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांसह अनेक लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 रुपयांत पोटभर जेवण, गॅस तुटवड्यातही पुण्यातील उपक्रम सुरूच, गरजूंना ठरतोय मोठा आधार
सर्व पहा

युद्ध आखातात, झळा नाशिकच्या पंगतीला! 2000 वऱ्हाडी राहणार उपाशी; वधूपित्याची थेट प्रशासनाकडे धाव

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi: युद्धामुळे गॅसचा तुटवडा, पण शिर्डीत भक्तांची पंगत सुरूच; साई मंदिराचा अद्भूत चमत्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल