TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : वेदनेने कळवळली... घरातले सगळे घाबरले, पण संकेत ऐकेना, तन्वीला मोठी दुखापत!

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये कॅप्टन्सीपदासाठीच्या टास्कमध्ये संकेतने तन्वीसोबत असं काही केलं की तिला दुखापत झाली आहे.
advertisement
1/8
BBM 6 : वेदनेने कळवळली... घरातले सगळे घाबरले, पण संकेत ऐकेना, तन्वीला मोठी दुखापत!
बिग बॉस मराठी 6 च्या घरात या आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी सदस्यांची चांगलीच धडपड होते आहे. या धडपडीत संकेतमुळे तन्वीला मोठी दुखापत झाली आहे.
advertisement
2/8
कॅप्टन्सीपदासाठी माशांच्या शिकारीचा टास्क देण्यात आला आहे. ज्यात माशांची शिकार करायची आहे, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मासे तो कॅप्टन होणार.
advertisement
3/8
जास्तीत जास्त माशांची शिकार करण्याची चुरस कॅप्टनीपदाच्या उमेदवारांमध्ये रंगली आहे. त्यामुळे हे उमेदवार एकमेकांचे मासे पळवताना दिसत आहेत.
advertisement
4/8
संकेतने तन्वीचे मासे पळवण्याचा प्रयत्न केला. तो तिला खेचताना, जमिनीवर पाडताना दिसतो. तिला दुखत होतं, ती वेदनेने ओरडत होती पण संकेतला मात्र त्याची काहीच पडली नव्हती. तो मासे पळवण्याच्याच प्रयत्नात होता.
advertisement
5/8
तन्वीचं ओरडणं आणि तिची परिस्थिती पाहून घरातील इतर सदस्य घाबरले. विशाल आणि सागर सोड सोड असं ओरडताना दिसतात. शेवटी सगळे तन्वीसाठी धावून येतात.
advertisement
6/8
तन्वीच्या भोवती घरातील सगळ्या सदस्यांची गर्दी झालेली दिसते, तिला काहीतरी झालं आहे आणि ते त्यातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
advertisement
7/8
तन्वी मोठ्याने ओरडते आहे, सागर थांब तन्वी, थांब तन्वी असं बोलतो आहे, तर विशाल सगळ्यांना दूर व्हा असं सांगताना ऐकू येतं आहे.
advertisement
8/8
हा प्रोमो पाहून पाहिल्यानंतर काहींनी संकेत विशालसारखा बनत असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी तन्वीलाही नाटक करत असल्याचं सांगत ट्रोल केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : वेदनेने कळवळली... घरातले सगळे घाबरले, पण संकेत ऐकेना, तन्वीला मोठी दुखापत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल