पुण्यात 396 हॉटेल्सना दणका
पुणे शहरात एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात करण्यात आलेल्या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. FDA ने ६६४ आस्थापनांची तपासणी केली, ज्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ३९६ हॉटेल्सना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईत ७ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या तीन मोठ्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
advertisement
प्रसिद्ध कॅफेंवरही कारवाईचे सावट
पुण्यातील प्रसिद्ध 'कॅफे गुडलक' मध्ये 'बन मस्का'मध्ये काचेचा तुकडा आढळल्याने जुलै २०२५ मध्ये त्यांचा परवाना १२ दिवस निलंबित करण्यात आला होता. तसेच लष्कर परिसरातील 'भिवंडी दरबार' मधील चिकन सूपमध्येही दोष आढळल्याने त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीमुळे कर्करोगासारखे आजार वाढत असल्याची चिंता आमदारांनी व्यक्त केली.
नवा कठोर कायदा येणार
राज्यात भेसळखोरांना जरब बसवण्यासाठी सरकार नवा कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. याचे प्रारूप अंतिम मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहे. तसेच पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जातील आणि मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी १९७ नवीन अधिकाऱ्यांची भरती केल्याची माहिती झिरवळ यांनी दिली.
तपासणीचे रिपोर्ट कार्ड (पुणे):
एकूण नमुने तपासले: ६६३
प्रमाणित (सुरक्षित): ५०१
कमी दर्जाचे: ५२
असुरक्षित (धोकादायक): ३१
लेबलमध्ये त्रुटी: २३
