झी मराठीचा फेमस हिरो Bigg Boss Marathi 6 मध्ये! पोस्ट लिहितच दिली क्लिअर हिंट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
झी मराठीच्या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता बिग बॉस मराठी 6 च्या घरात जाणार आहे. त्याने पोस्ट लिहित क्लिअर हिंट दिली आहे.काय लिहिलंय पोस्टमध्ये?
advertisement
1/10

11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठी 6 ची सर्वांना उत्सुकता आहे. घरात कोणता स्पर्धक जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अनेक कलाकारांची नाव समोर आली आहेत. त्यातील काही कन्फर्म स्पर्धक देखील आहेत.
advertisement
2/10
अशातच आणखी एका अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे जो बिग बॉसमध्ये जाणार आहे. अभिनेत्यानं पोस्ट लिहित थेट हिंट दिली आहे. कोण आहे हा अभिनेता? त्याने पोस्टमध्ये असं काय लिहिलं आहे.
advertisement
3/10
अभिनेत्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला माझं भरभरून प्रेम आणि आदर. मी काही काळासाठी इन्स्टाग्रामपासून थोडा विराम घेत आहे."
advertisement
4/10
"या पुढचा प्रवास 'टीम आयुष संजीव' माझ्या वतीने पुढे नेत राहील. हे अकाउंट सक्रियच राहील काम सुरूच राहील. मात्र काही काळ मी इथे थेट उपस्थित राहणार नाही."
advertisement
5/10
अभिनेत्याने पुढे लिहिलंय, "आतापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तुम्ही दाखवलेलं प्रेम, विश्वास आणि पाठिंबा यासाठी मनापासून धन्यवाद. त्याचं महत्त्व शब्दांत मांडणं अशक्य आहे. प्रवास थांबत नाहीये…फक्त त्याची दिशा थोडी बदलतेय."
advertisement
6/10
अभिनेता आयुष संजीवची ही पोस्ट आहे. झी मराठीवरील '36 गुणी जोडी' या मालिकेतून आयुष्य प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'बॉस माझी लाडाची' या मालिकेतूनही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
7/10
आयुषने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो बिग बॉस मराठी 6 मध्ये जात असल्याची थेट हिंट मिळत आहे. त्याच्या पोस्टवर देखील अनेक चाहत्यांनी त्याला बिग बॉसमध्ये जातोय, जिंकून ये अशा कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
8/10
अभिनेत्री हर्षदा खानविलकरने कमेंट करत लिहिलंय, 'शाइन ऑन बॉय'. लावणी आशिष पाटीलने 'ओके' अशी कमेंट केली आहे.
advertisement
9/10
एका चाहत्यानं लिहिलंय, "जीत के आना हिरो, आम्ही वाट पाहतोय." दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय,"महाराजा जैसा जा के तू आना यारा." आणखी एकानं लिहिलंय, "बिग बॉस ला जातोय."
advertisement
10/10
अभिनेता आयुष संजीवसह अभिनेत्री दिपाली सय्यद, सागर कारंडे, संकेत पाठक, अनुश्री माने हे कलाकार देखील बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
झी मराठीचा फेमस हिरो Bigg Boss Marathi 6 मध्ये! पोस्ट लिहितच दिली क्लिअर हिंट