English Grammar : ‘फ’ साठी इंग्रजीत F लिहायचं की PH? तुमचाही होतो गोंधळ, या यामागचं भाषेचं सूत्र समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Spelling rules in English : काही लोक 'Fan' मध्ये 'F' वापरतात, तर 'Phone' मध्ये 'PH' वापरला जातो. दोन्हीकडे उच्चार 'फ' चा आहे, पण स्पेलिंग मात्र बदलली असं का?
advertisement
1/9

आपण जेव्हा इंग्रजी शिकतो किंवा व्हॉट्सॲपवर चॅटिंग करतो, अनेकदा मराठी शब्द इंग्रजीत लिहितो किंवा कधीकधी इंग्रजी शब्द मराठीत लिहितो, अशावेळी अनेकदा लोकांना काही शब्द लिहिताना गोंधळायला होतं की कोणतं अक्षर कशासाठी वापरावं, यापैकीच एक आहे ‘फ’ अक्षरांच्या शब्दांचा उच्चार
advertisement
2/9
यासाठी 'F' वापरायचं की 'PH'? असा गोंधळ अनेकांना होतो. काही लोक 'Fan' मध्ये 'F' वापरतात, तर 'Phone' मध्ये 'PH' वापरला जातो. दोन्हीकडे उच्चार 'फ' चा आहे, पण स्पेलिंग मात्र बदलली असं का?
advertisement
3/9
चला तर मग, आपल्या दररोजच्या आयुष्यातील उदाहरणांमधून हा छोटासा पण महत्त्वाचा फरक समजून घेऊया.
advertisement
4/9
'F' चा वापर कधी होतो?बहुतेक सामान्य इंग्रजी शब्दांमध्ये 'फ' या उच्चारासाठी 'F' वापरला जातो. हा उच्चार थेट आणि सोपा असतो.उदाहरण: Family (फॅमिली) म्हणजे तुमचे कुटुंब.Food (फूड) - जेवण.Fast (फास्ट) - वेगाने.Friend (फ्रेंड) - मित्र.जर शब्द मूळचा इंग्रजी किंवा लॅटिन असेल, तर तिथे डोळे झाकून 'F' चा वापर केला जातो.
advertisement
5/9
'PH' चा वापर कधी होतो?येथेच खरी गंमत आहे! इंग्रजी भाषेतील जे शब्द मूळचे ग्रीक (Greek) भाषेतून आलेले आहेत, तिथे 'फ' साठी 'PH' वापरला जातो. सुरुवातीला ग्रीक भाषेत 'P' आणि 'H' असे दोन वेगवेगळे उच्चार होते, जे नंतर एकत्र येऊन 'फ' बनले.उदाहरण: Phone (फोन) - ग्रीक शब्द 'Phono' (आवाज) वरून आला आहे.Photo (फोटो) - ग्रीक शब्द 'Phos' (प्रकाश) वरून आला आहे.Pharmacy (फार्मसी) - औषधांचे दुकान.Alphabet (अल्फाबेट) -वर्णमाला.
advertisement
6/9
नावांच्या बाबतीत काय करावे?आपल्याकडे अशी अनेक नावे आहेत जिथे 'F' आणि 'PH' दोन्ही दिसतात. यात Farhan (फरहान): येथे 'F' वापरला जातो कारण हे नाव पर्शियन/अरबी मूळचे आहे. तर Philip (फिलिप): येथे 'PH' वापरला जातो कारण हे नाव ग्रीक मूळचे आहे.
advertisement
7/9
सोशल मीडियावर नावे लिहिताना अनेकजण आपल्या आवडीनुसार बदल करतात. उदाहरणार्थ, काहीजण 'Sufiyan' लिहितात तर काही 'Suphian'. पण अधिकृत कागदपत्रांवर जे स्पेलिंग आहे, तेच पाळणे महत्त्वाचे ठरते.
advertisement
8/9
रोजच्या आयुष्यातील एक सोपी ट्रिकजर तुम्हाला एखादा शब्द लिहायचा असेल आणि तुम्ही गोंधळलेले असाल, तर हे लक्षात ठेवा. जर शब्द विज्ञान, तंत्रज्ञान किंवा तत्त्वज्ञानाशी (Science or Philosophy) संबंधित असेल, तर तिथे 90% वेळा 'PH' येतो (उदा. Physics, Photosynthesis, Philosophy). जर शब्द साधा आणि घरगुती असेल, तर तिथे 'F' येतो (उदा. Father, Flower, Fruit).
advertisement
9/9
इंग्रजी भाषेत 'F' आणि 'PH' दोन्ही बरोबर आहेत, फक्त त्यांचे 'मूळ' वेगवेगळे आहे. आता पुढच्या वेळी 'Phone' लिहिताना किंवा 'Friend' लिहिताना तुम्हाला त्यामागचं लॉजिक नक्कीच आठवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
English Grammar : ‘फ’ साठी इंग्रजीत F लिहायचं की PH? तुमचाही होतो गोंधळ, या यामागचं भाषेचं सूत्र समजून घ्या