काय आहे कारण?
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात सध्या रस्त्याचे विस्तारीकरण आणि खडीकरणाचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता पूर्णतः बंद ठेवणे आवश्यक आहे. या काळात दुचाकी, चारचाकी किंवा कोणतीही एकेरी वाहतूक सुरू राहणार नाही.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
बोपदेव घाट बंद असल्यामुळे पुरंदर आणि सासवड भागातून पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे: 1. दिवे घाट मार्ग 2. नारायणपूरमार्गे कापूरहोळ किंवा चिव्हेवाडी घाट
सासवड-कोंढवा प्रवासासाठी बोपदेव घाट हा सर्वात जवळचा मार्ग असला तरी, कामाच्या निकडीमुळे तो आठवडाभर बंद राहणार आहे. "रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे," असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग (हवेली २) चे शाखा अभियंता देवेन मोरे यांनी केले आहे.
बोपदेव घाट हा सासवड, पुरंदर आणि परिसरातील गावांसाठी पुण्याकडे जाणारा सर्वात जलद मार्ग मानला जातो. हा घाट आठवडाभर बंद राहणार असल्याने नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आता वाढणार आहे. विशेषतः कोंढवा आणि येवलेवाडी भागात राहणाऱ्या नागरिकांना सासवडकडे जाण्यासाठी आता दिवे घाटातून मोठा वळसा घालून जावे लागेल.
