TRENDING:

20-20 सुरू करू नका, नाहीतर..., जलील यांच्यासाठी ओवेसी आले धावून, जाहीर सभेतून दिला इशारा

Last Updated:

'जलील यांच्या गाडीवर हल्ला करणारे लक्षात ठेवा, तुम्ही बच्चे आहात, तुम्ही माझ्यासमोर पावसातले बेंडुक आहात'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू असताना एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर एमआयएमचे सर्वेसर्वा असाउद्दीन ओवेसी यांनी शहरात सभा घेऊन हल्लेखोरांना थेट इशारा दिला.  'ज्याचे धोतर फाटले आहे, ते आमची पगडी पाडण्याचे प्रयत्न करत आहे, असे खेळ खेळू नका, बाबांनो, 20-20 सुरू करू नका नाहीतर महागात पडेल' असा इशाराच ओवेसींनी दिला.

advertisement

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असाउद्दीन ओवेसी यांची विराट सभा पार पडली. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर या सभेला विराट अशी गर्दी उसळली होती. जलील यांच्या भाषणानंतर ओवेसी यांनी आपल्या स्टाईलमध्ये हल्लेखोरांना इशारा दिला.

"ज्यांनी लोकसभेत पराभव केला, त्यांचा डिपॉझिट जप्त करावे. जलील यांच्या गाडीवर हल्ला करणारे लक्षात ठेवा, तुम्ही बच्चे आहात, तुम्ही माझ्यासमोर पावसाचे बेंडुक आहात. सहज इथे पोहचलो नाही, जेलमध्ये राहून आलो आहे, माझ्यावर गोळीबार झाला होता, तुम्ही मारणारे आहेत, आम्ही वाचवणारे आहोत. ज्याचे धोतर फाटले आहे, ते आमची पगडी पाडण्याचे प्रयत्न करत आहे. असे खेळ खेळू नका, बाबांनो, 20-20 सुरू करू नका, महागात पडेल' असा इशारा ओवेसींनी दिला.

advertisement

तसंच, "पोलिसांना सांगणे आहे, कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात येणार असेल तर त्यांना दुबईला पाठवा. यांचे धंदे बंद करा, तुमच्या सारखे 56 पाहिले आहे. 15 तारखेला तुम्हाला उत्तर मिळेल, असंही ओवेसींनी ठणकावलं.

जर इम्तियाज जलील लोकसभेत असते, तर नरेंद्र मोदी वक्फचा कायदा आणू शकत नसते. जलील यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, आज तेच चेहरे आमच्या पाठीवर खंजीर खुपसण्यासाठी आले आहेत. टिपू सुलतानला मारणारे कोण होते, मुसलमान होते. संभाजीनगरच्या जनतेच्या लोकांना पुन्हा एकदा लपवून बसलेल्या या लोकांचे डिपॉझिट जप्त करायचे आहे. राष्ट्रवादी, असो, भाजप, आणि दोन्ही शिवसेना आहे, त्यांना वाटते, आम्ही एकत्र येऊ नये, यांना सर्वात जास्त त्रास होत असतो, दिल्लीत बसलेल्या मोदी असो की फडणवीस यांना हे आवडत नाही. यांना पैसे देऊन लोक आणावे लागतात, असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला.

advertisement

भाषणात सर्रास औरंगाबाद उल्लेख

दरम्यान, ओवेसी यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद असा सर्रास उल्लेख केला. अल्लाहकडे मागणी करतो माझा दफनविधी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)ला झाला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर तुमचं आहे तसंच माझं देखील आहे, तुमच्यात राहून उभा सांगतो, एकटा देखील राहिलो तरीही तुमच्यासाठी लढत राहील, अशी इच्छाच ओवेसींनी बोलून दाखवली.

advertisement

"दिल्लीत एक मस्जिद पाडण्यात आले, न्यायालयाने चुकीचे आदेश दिले आहे, दिल्लीत वाईट लोक बसले आहे. काळे कायद्यामुळे दर्गा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे, दिल्लीत जे झाले ही एक सुरूवात आहे. अशा उड्या मारणाऱ्या लोकांना फक्त अपल्या जातीशी घेणं आहे. मस्जिद वाचवण्यासाठी भीक मागत आहे. जे लोक मुंबई-औरंगाबादमध्ये बसून विचार करत असतील की काही होणार नाही, बिहारमध्ये देखील असेच बोलले जात होते. औरंगाबादमध्ये काहीही होणार नाही,अल्लाह आम्हाला यशस्वी करेल, 15 ला फक्त आकाशात पतंग असेल, असंही ओवेसी म्हणाले.

जलील यांचा अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यावर आरोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, 'आम्हाला हरवण्याचे काम आमच्यामधील दलाल यांनी केले. लोकसभेत,विधानसभा निवडणुकीत असलेली टोळी आता पुन्हा आली आहे. जी लोक राशन चोरतात त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, खुटक्यांचे धंदे यांचे आहेत. ज्यांनी आज हल्ला केला.आम्ही शांततेत निवडणूक लढू पण तुम्ही चालून आला तर याद राखा आम्ही पण तयार आहोत. तुमच्याकडे गुंडे आहेत तर असे समजू नका आम्ही कमी आहोत. भाजपचे आमदार आणि मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे मंत्री  संजय शिरसाट यांनी हे लोक आमच्यावर सोडले आहेत, असा आरोप यावेळी  इम्तियाज जलील यांनी केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
20-20 सुरू करू नका, नाहीतर..., जलील यांच्यासाठी ओवेसी आले धावून, जाहीर सभेतून दिला इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल