TRENDING:

तेजश्रीने गोरेगाव सोडल्याचं दु:ख सांगितलं; फडणवीसांनी दिलं असं उत्तर की अभिनेत्रीचा चेहराच खुलला

Last Updated:
नुकत्याच झालेल्या 'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात तेजश्रीने आपलं हे दु:ख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलं. मात्र, त्यावर फडणवीसांनी जी उत्तरे दिली आणि भविष्यातील ठाण्याचा जो 'प्लॅन' सांगितला, ते ऐकून तेजश्रीचा चेहरा आनंदाने खुलला.
advertisement
1/6
तेजश्रीनं गोरेगाव सोडल्याचं दु:ख सांगितलं; CMनं दिलं असं उत्तर तिचा चेहराच खुलला
मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर हे केवळ किलोमीटरमध्ये मोजलं जात नाही, तर ते 'ट्रॅफिक'मध्ये मोजलं जातं. हीच ट्रॅफिकची डोकेदुखी सहन न झाल्याने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिचं गोरेगावमधील घर सोडून ठाण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या 'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात तेजश्रीने आपलं हे दु:ख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलं. मात्र, त्यावर फडणवीसांनी जी उत्तरे दिली आणि भविष्यातील ठाण्याचा जो 'प्लॅन' सांगितला, ते ऐकून तेजश्रीचा चेहरा आनंदाने खुलला.
advertisement
2/6
या संवादादरम्यान फडणवीस म्हणाले, "मागील सरकारच्या काळात केवळ 11 किलोमीटरची मेट्रो बनवण्यात आली होती. पण आज आम्ही 200 किलोमीटरपर्यंत मेट्रोचं काम नेलं आहे. ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आम्ही 'रिंग मेट्रो'ला (Thane Ring Metro) देखील मान्यता दिली आहे."
advertisement
3/6
मुंबईकरांचा आणि ठाणेकरांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लोकल ट्रेनची गर्दी आणि उकाडा. यावर फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, "आता आम्ही लोकल ट्रेनला देखील मेट्रोसारखे बंद दरवाजा असलेले वातानुकूलित (AC) डब्बे देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या एसी लोकलचा खर्च नॉर्मल लोकलसारखाच राहणार आहे. एसी प्रवासासाठी आम्ही तिकीट दर वाढवणार नाही. 'वन टॅग वन तिकीट' या योजनेमुळे तुम्ही संपूर्ण एमएमआर क्षेत्रात एकाच तिकिटावर फिरू शकाल."
advertisement
4/6
तेजश्रीने गोरेगाव सोडल्याचं कारण सांगताना प्रवासाचा वेळ हा महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी दोन मोठ्या प्रकल्पांची माहिती दिली. पहिलं म्हणजे ठाणे-बोरिवली ट्विन टनेल, ज्यामुळे 23 किलोमीटरचं अंतर थेट 15 किलोमीटरने कमी होणार आहे. हा बोगदा ठाणे आणि बोरिवलीला जोडणार आहे. यामुळे जो प्रवास करायला 2 तास लागतात, तो आता फक्त 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल.
advertisement
5/6
दुसरा पर्याय म्हणजे कोस्टल रोड, कोपरीपासून कोस्टल रोड बांधला जात आहे, ज्यामुळे घोडबंदर रोड, नाशिक हायवे आणि भिवंडीमधील ट्रॅफिक पूर्णपणे मोकळं होणार आहे. लांबच्या प्रवासासाठी निघालेला ट्राफिक शहरात न जाता बाहेरच्या बाहेर निघून जाईल, ज्यामुळे सिटीमधील ट्राफीकची समस्या सुटेल.
advertisement
6/6
पुढच्या दोन वर्षांत ठाणेकरांना पहिल्या टप्प्यातील मेट्रोमधून प्रवास करता येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. फडणवीसांचं हे 'व्हिजन' ऐकल्यानंतर तेजश्री प्रधानला केवळ दिलासाच मिळाला नाही, तर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तेजश्रीने गोरेगाव सोडल्याचं दु:ख सांगितलं; फडणवीसांनी दिलं असं उत्तर की अभिनेत्रीचा चेहराच खुलला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल