TRENDING:

KDMC Elections : कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा गेम झाला, ठाकरेंनी तिकीट दिलेला उमेदवार शिंदेंच्या गळाला लागला!

Last Updated:

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवाराने थेट शिवसेनेच्या उमेदवारालाच बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
 कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा गेम झाला, ठाकरेंनी तिकीट दिलेला उमेदवार शिंदेंच्या गळाला लागला!
कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा गेम झाला, ठाकरेंनी तिकीट दिलेला उमेदवार शिंदेंच्या गळाला लागला!
advertisement

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठाने रामचंद्र गणपत माने उर्फ भीमा यांना पॅनल 30 (ड) मधून उमेदवारी दिली होती. पण आता रामचंद्र गणपत माने यांनी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढणारे अर्जुन बाबू पाटील आणि वॉर्ड क्रमांक 30 मधल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचं पत्र रामचंद्र माने यांनी दिलं आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमधल्या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

advertisement

रामचंद्र माने यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उमेदवार अर्जुन पाटील, ओम लोके, सागर जेधे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. याआधी 30 ड मधील डॉ मनोज बामा पाटील यांनी अर्जुन पाटील यांना पाठिंबा दिला होता. आता अर्जुन पाटील यांच्यासमोर एकही उमेदवार निवडणूक लढणार नसून जे दोघे होते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे.

advertisement

कल्याण-डोंबिवलीमधील बिनविरोध उमेदवार

जिल्हा/शहर वॉर्ड / प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव पक्ष
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 रमेश म्हात्रे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 विश्वनाथ राणे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. रेश्मा निचल शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. राजन मराठे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 वृषाली जोशी शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 (ब) ज्योती पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 अ रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.26 अ मुकंद तथा विशू पेडणेकर भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 27 ड महेश पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 19 क साई शेलार भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 अ दिपेश म्हात्रे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 ड जयेश म्हात्रे- भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 क हर्षदा भोईर भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.19 ब डॉ.सुनिता पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 19 अ पूजा म्हात्रे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 30 अ रविना माळी भाजप
कल्याण डोंबिवली पॅनेल 27 (अ) मंदा पाटील भाजप
कल्याण डोंबिवली पॅनेल 28 (अ) हर्षल मोरे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 26-क आसावरी नवरे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 26 ब रंजना पेणकर भाजप

advertisement

कल्याण डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात भाजपच्या 15 तर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

शिवसेनेच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Elections : कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा गेम झाला, ठाकरेंनी तिकीट दिलेला उमेदवार शिंदेंच्या गळाला लागला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल