BBM6 : ट्रॉफी सूरजची, पण खिसा गौरवचा गरम; बिग बॉस मराठी आणि हिंदीच्या बक्षीस रकमेत मोठा 'झोल'?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Big Boss Marathi Season 6 : अलीकडेच पार पडलेल्या बिग बॉस मराठी सीझन 5 आणि बिग बॉस हिंदी सीझन 19 च्या विजेत्यांना मिळालेल्या बक्षिसांची मोठी चर्चा रंगली आहे.
advertisement
1/6

मनोरंजन विश्वात सध्या रिअ‍ॅलिटी शोचा प्रचंड दबदबा आहे, आणि त्यातही 'बिग बॉस' म्हटलं की प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. केवळ खेळाडूंचा खेळच नाही, तर विजयानंतर त्यांच्या पदरात नेमकी किती रक्कम पडते, यावरही सर्वसामान्यांच्या नजरा असतात. अलीकडेच पार पडलेल्या बिग बॉस मराठी सीझन 5 आणि बिग बॉस हिंदी सीझन 19 च्या विजेत्यांना मिळालेल्या बक्षिसांची मोठी चर्चा रंगली आहे.
advertisement
2/6
बिग बॉस मराठी सीझन 5: सुरज चव्हाणने किती कमाई केली?रितेश देशमुखने होस्ट केलेल्या 'बिग बॉस मराठी 5' चा ग्रँड फिनाले ऑक्टोबर 2024 मध्ये पार पडला. 'झापुक झुपुक' फेम सुरज चव्हाणने सर्व दिग्गजांना मागे टाकत ट्रॉफीवर नाव कोरले. (Bigg Boss Marathi)
advertisement
3/6
रोख रक्कम (Cash Prize): सुरजला सुरुवातीला 25 लाख रुपये जाहीर झाले होते, परंतु टास्कदरम्यान काही रक्कम कमी झाल्यामुळे त्याला प्रत्यक्ष 14.6 लाख रुपये रोख मिळाले. Indiatoday.in आणि Business Standard च्या रिपोर्टनुसार रोख रकमेव्यतिरिक्त त्याला 10 लाख रुपयांचे ज्वेलरी व्हाउचर आणि एक आलिशान टू-व्हीलर गाडी बक्षीस म्हणून मिळाली.
advertisement
4/6
बिग बॉस हिंदी सीझन 19: गौरव खन्नाला काय मिळाले?हिंदी बिग बॉसच्या नुकत्याच संपलेल्या (डिसेंबर 2025) 19 व्या सीझनमध्ये 'अनुपमा' फेम अभिनेता गौरव खन्ना (GK) हा विजेता ठरला. त्याने अंतिम फेरीत फरहाना भट्टला पराभूत केले.
advertisement
5/6
गौरव खन्नाला विजेतेपदाची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये रोख रक्कम मिळाली. रोख रकमेसह त्याला एक ब्रँड न्यू लक्झरी कार देखील भेट म्हणून देण्यात आली. Times of India आणि Live Mint च्या वृत्तानुसार गौरवाच्या मानधनाबद्दल (Remuneration) सांगितले जाते की, तो या सीझनचा सर्वात महागडा स्पर्धक होता. त्याला प्रति आठवडा सुमारे १७.५ लाख रुपये मानधन मिळत होते. त्या हिशोबाने १४ आठवड्यांत त्याने केवळ मानधनातून 2.45 कोटी रुपयांची तगडी कमाई केली आहे. (Bigg Boss Hindi)
advertisement
6/6
दोन्ही शोमधील बक्षीस रकमेतील तफावतमराठी बिग बॉसची व्याप्ती आणि दिवस कमी म्हणजे फक्त 70 दिवस असल्याने तिथली बक्षीस रक्कम हिंदीच्या तुलनेत जी सुमारे 100-105दिवस चालते, त्यानुसार कमी असते. मात्र, दोन्ही ठिकाणी विजेत्यांना मिळणारे महत्व, काम आणि प्रसिद्धी ही पैशांपेक्षाही मोठी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 : ट्रॉफी सूरजची, पण खिसा गौरवचा गरम; बिग बॉस मराठी आणि हिंदीच्या बक्षीस रकमेत मोठा 'झोल'?