TRENDING:

Aajache Rashibhavishya: मंगल दिवस! गुरुकृपा होणार, जुलैच्या पहिल्याच दिवशी नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: मंगळवार, दि. 1 जुलै हा महिन्याचा पहिलाच दिवस खास असणार आहे. काही राशींवर गुरुकृपा होणार असून त्यांचं नशीब पालटणार आहे.
advertisement
1/13
मंगल दिवस! गुरुकृपा होणार, जुलैच्या पहिल्याच दिवशी नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
मेष राशी - कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. तुमची कलात्मक आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील - त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - स्वत:ची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - धनाची आवश्यकता कधीही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. झाले गेले विसरून आज पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न करा. अविवाहित मंडळींना आज चांगली बातमी मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार.
advertisement
6/13
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हालाही ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - प्रत्येकाच्याच गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुमची ओढाताण होईल. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला शुभ ठरणार आहे. राहिलेली कामे आज मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी आज आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित केल्याने त्याचा फायदा नक्कीच पुढे होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. संघर्षाची स्थिती निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. तुम्हाला आवडणारी वस्तू आज तुम्हाला मिळू शकते. आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आज तुमचा शुभ आणि 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज केलेले सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या जोडीदाराकडून आज काहीतरी आनंदाची बातमी ऐकून तुमचा दिवस आज आनंदी जाणार आहे. प्रवासाचा योग आज आहे पण प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात तथापि, तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. आज नको तिथे जास्त बोलणे टाळा याने समोरील व्यक्तीचे मन दुखाऊ शकते. ज्याचा मारीनं तुम्हाला होईल. आज विना कुठल्या पूर्व सूचनेने आज तुमचा कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मंगल दिवस! गुरुकृपा होणार, जुलैच्या पहिल्याच दिवशी नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल