Nepal Fact : नेपाळमध्ये सुरु आहे 2082 वर्ष, इंटरनेटच नाही कॅलेंडरमध्ये ही भारतापेक्षा 57 वर्ष पुढे आहे हा देश
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नेपाळ हा आपल्या भारताच्या बाजूचा देश आहे मग असं असेल तर या देशात 2082 वर्ष कसं सुरु आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
advertisement
1/6

जगभरातील बहुतांश देश आजही ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतात. जे आपण भारतात देखील वापरतो. या कॅलेंडरमध्ये जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने असतात. जे एकून 365 दिवसांचे असतात. भारतात आपण असंच वर्ष मोजतो आणि त्यानुसार भारतात आका 2025 साल सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय का की नेपाळमध्ये सध्या 2082 वर्ष सुरु आहे.
advertisement
2/6
आता तुम्हा हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल आणि हे कसं शक्य आहे असा ही प्रश्न पडला असेल, म्हणजे नेपाळ हा आपल्या भारताच्या बाजूचा देश आहे मग असं असेल तर या देशात 2082 वर्ष कसं सुरु आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
advertisement
3/6
पण नेपाळमध्ये वेळ किंवा दिवस मोजण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तेथे विक्रम संवत कॅलेंडर अधिकृत स्वरूपात वापरले जाते, जे ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा तब्बल 56–57 वर्षे पुढे आहे. त्यामुळे आपण 2025 मध्ये असताना, नेपाळमध्ये लोक 2082 विक्रम संवत साजरा करत आहेत. यामुळे एकाच वेळी दोन शतकांच्या पिढ्या जणू शेजारी राहात आहेत असं वाटतं.
advertisement
4/6
विक्रम संवतची सुरुवात सम्राट विक्रमादित्य यांच्या काळात झाली होती. भारतीय उपखंडातील प्राचीन गणित, खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांचा प्रभाव या दिनदर्शिकेत दिसतो. यात चंद्र-सौर पद्धतीचा वापर केला जातो, त्यामुळे सण-उत्सव आणि कृषी हंगाम यांचा जवळचा संबंध राहतो.
advertisement
5/6
नेपाळमध्ये सरकारी कामकाज, शाळा-कॉलेजांचे अभ्यासक्रम, सणांचे कॅलेंडर सगळं विक्रम संवता कॅलेंडरवुसार चालतं. तिथल्या लोकांसाठी हा केवळ दिनदर्शिकेचा हिशेब नाही, तर सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. लग्नमुहूर्त, दशै, तिहार यांसारखे मोठे उत्सव ह्याच पद्धतीनुसार ठरतात.
advertisement
6/6
नेपाळच्या या अनोख्या कॅलेंडरमुळे मोजण्यामध्ये फक्त संख्या बदलत नाही, तर सांस्कृतिक दृष्टिकोनही वेगळा होतो हे जाणवतं. एका अर्थाने नेपाळ "भविष्यात" जगतो, पण त्याच वेळी शतकानुशतकांच्या परंपरा जपत राहतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Nepal Fact : नेपाळमध्ये सुरु आहे 2082 वर्ष, इंटरनेटच नाही कॅलेंडरमध्ये ही भारतापेक्षा 57 वर्ष पुढे आहे हा देश