TRENDING:

Weather Alert: उन्ह, पाऊस की थंडी, शुक्रवारी मुंबईसह कोकणात विचित्र हवामान, IMD चं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आता नोव्हेंबरमध्ये हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून काही ठिकाणी थंडीची चाहुल लागली आहे.
advertisement
1/5
उन्ह, पाऊस की थंडी, शुक्रवारी मुंबईसह कोकणात विचित्र हवामान, IMD चं अपडेट
महाराष्ट्रात आता हवामान बदलत चाललं आहे. काही भागांमध्ये अजूनही रिमझिम पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी ऊन आणि गार वाऱ्याची झुळूक जाणवते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सकाळच्या सुमारास वातावरण थोडं गार वाटतंय, पण दुपारी ऊन जाणवतं. काही भागांमध्ये अजूनही ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस आहे.
advertisement
2/5
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल जाणवतोय. सकाळी थंडगार वारा आणि धुके जाणवते, तर दुपारी ऊन आणि आभाळ ढगाळ असं मिश्र वातावरण आहे. काही भागांमध्ये अगदी हलक्या सरींची शक्यता आहे. आज मुंबईत कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सियस असणार आहे. आर्द्रता जवळपास 78 टक्क्यांच्या आसपास राहील आणि वाऱ्याचा वेग 10 ते 12 किमी प्रतितास असा असणार आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागात आज पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अधूनमधून रिमझिम सरी आता थांबल्या आहेत. आज या भागात कोरडं आणि थोडं थंड वातावरण राहील. सकाळच्या सुमारास गार वाऱ्यामुळे वातावरण सुखद वाटतंय, आणि दिवसभर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा कोणताही अंदाज नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणानंतर आज आकाश खुलं राहणार आहे. सकाळच्या सुमारास थोडी थंडीची जाणीव होऊ शकते. दिवस पुढे सरकला की ऊन पडेल, आणि वातावरण अगदी आल्हाददायक राहील
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये अजूनही पावसाचा खेळ सुरूच आहे. काही भागांमध्ये रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये तापमान 30 ते 24 अंश, रत्नागिरीत 31 ते 25 अंश आणि सिंधुदुर्गात 32 ते 26 अंश सेल्सियस असेल. या भागांमध्ये आर्द्रता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असून वाऱ्याचा वेग 12 ते 15 किमी प्रतितास इतका राहील. अजून थंडीची चाहूल नाही पण दमट उष्णतेमुळे वातावरण थोडं अस्वस्थ जाणवतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: उन्ह, पाऊस की थंडी, शुक्रवारी मुंबईसह कोकणात विचित्र हवामान, IMD चं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल