चला तर जाणून घेऊया या योजनेतील पैसे काढण्याचे नियम पूर्ण मुदत संपल्यानंतर (Maturity) आणि त्याआधीच्या काही विशेष परिस्थितीत कसे आणि केव्हा पैसे काढता येतात.
मॅच्युरिटी नंतर रक्कम काढणे
PPF खात्याचा मुदतकाल 15 वर्षांचा असतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खातेधारक संपूर्ण मूळ रक्कम आणि जमा झालेलं व्याज कोणत्याही दंडाशिवाय काढू शकतो. सर्वात चांगली बाब म्हणजे ही संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) असते. खातेधारकाला हवे असल्यास तो खाते बंद न करता ते आणखी पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकतो आणि व्याज मिळवत राहू शकतो.
advertisement
मुदतपूर्व आंशिक रक्कम काढणे
जर तुम्हाला 15 वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच काही रक्कमेची गरज असेल, तर खाते उघडल्यापासून सहावे आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सातव्या वर्षापासून आंशिक रक्कम काढण्याची परवानगी मिळते.
निकासीची मर्यादा म्हणजे निकासीच्या वर्षाच्या आधीच्या चौथ्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेल्या बॅलन्सच्या 50% पर्यंत रक्कम. मात्र ही आंशिक निकासी फक्त वर्षातून एकदाच करता येते. यासाठी संबंधित फॉर्म C भरून बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावा लागतो.
पीपीएफ खाते वेळेपूर्वी बंद करणे
PPF खाते दीर्घकालीन बचतीसाठी असले तरी काही विशेष परिस्थितीत ते 5 वर्षांनंतर वेळेपूर्वी बंद करता येते. पण यासाठी काही अटी आहेत आणि त्या ठराविक परिस्थीतीत लोक हे करु शकतात.
जसे की खातेधारक, जोडीदार किंवा आश्रित मुलांना गंभीर किंवा जीवघेणी आजार असणे, उच्च शिक्षणासाठी निधीची गरज भासणे, परदेशात स्थायिक होणे
अशा वेळी सरकार खातेधारकाच्या व्याजदरातून 1% कपात करते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फॉर्म 5 आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित बँक/पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतात.
खातेधारकाच्या मृत्यूच्या वेळी जर खातेधारकाचा मृत्यू मुदतपूर्व झाला, तर नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला संपूर्ण रक्कम तत्काळ मिळते. या परिस्थितीत 15 वर्षांची लॉक-इन अवधि लागू होत नाही.
ही योजना दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. योग्य माहिती आणि नियोजनाने तुम्ही PPF द्वारे सुरक्षित आणि स्थिर भविष्याची खात्री मिळवू शकता.
