TRENDING:

Aajache Rashibhavishya: गुड न्यूज मिळेल, संकट दूर पळेल; मेष ते मीन राशींसाठी बुधवार कसा? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार कसा असणार आहे? याविषयी ज्योतिषी अशोक पाटील यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
advertisement
1/13
Aajache Rashibhavishya: गुड न्यूज मिळेल, संकट दूर पळेल; मेष ते मीन राशींसाठी बुधवार कसा? आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन जबाबदारी आणि आव्हाने घेऊन येत आहे. त्यामुळे वाद विवाद टाळा. परिस्थिती संयमाने हाताळा. मिथुन राशीत असलेला चंद्र तुमच्यासमोर अनेक जबाबदाऱ्या उभ्या करणार आहे. कामाचे योग्य नियोजन करा.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तींचा आजच्या दिवशी आर्थिक बजेट कोलमडणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानात असल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी खर्च करा. कुटुंबासोबत वेळ घालवा.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कभी खुशी कभी गम असा असणार आहे. आजच्या दिवशी कामाचा ताण जाणवू शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करा. तुमच्या राशीचा स्वामी बुध दहाव्या कर्म स्थानात मंगळासोबत असल्यामुळे व्यवसायात यश मिळण्याचे संकेत आहेत.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार असून आज नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
5/13
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजच्या दिवशी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. कामाचे योग्य नियोजन करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. मुलाकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस हा समाधानकारक आणि आनंदाचा असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध स्वतःच्या राशीत षष्ठ स्थानात भ्रमण करत असल्यामुळे शत्रूंवर विजय मिळेल.
advertisement
7/13
आज काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कामात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. कारण तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव आणि मिथुन राशीत चंद्र विराजमान आहे. तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. संयम आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. नवीन योजना यशस्वी होतील. तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला आज चाखायला मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः चांगला दिवस आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस उत्तम योग घेऊन येत आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनि तृतीय स्थानात तर चंद्र षष्ठ स्थानात आहे. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते तेव्हा तो जातक शत्रूंवर विजय मिळवतो. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल. मित्रांच्या पाठिंब्यामुळे कामे मार्गी लागतील. तुमच्या राशीचा स्वामी शनि द्वितीय स्थानातील मीन राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचे योग आहेत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु चतुर्थ अर्थात सुख स्थानात असून चंद्र सप्तम स्थानावर भ्रमण करत आहे. त्यामुळे नवीन मिळकतीचे मार्ग खुले होणार आहेत. कामात प्रगती होईल. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य उत्तम राहील.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: गुड न्यूज मिळेल, संकट दूर पळेल; मेष ते मीन राशींसाठी बुधवार कसा? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल