या कामादरम्यान इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी 813 मि.मी. व्यासाची जलवाहिनी बाधित होत असल्याने तिच्या जागी 900 मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. एकूण 2200 मीटर लांबीच्या या जलवाहिनीपैकी 520 मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले असून आता जुन्या जलवाहिनीला बंद करून नव्या जलवाहिनीशी जोडणी करण्यात येणार आहे.
advertisement
या कारणामुळे शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार, 28 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या भागात पुरवठा बंद राहणार
या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवले नगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा क्रमांक 2, 3 व 4, चैत्तीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसन नगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी. पी. तलाव तसेच येऊर परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा मिळणार नाही.
शनिवारी पाणीपुरवठा पूर्ववत
शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल. मात्र, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.






