Aajache Rashibhavishya : धनलाभ होईल, अचानकपणे आनंदाची बातमी मिळेल, फक्त या चुका टाळा, आजचं राशिभविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असणार आहे? याविषयी ज्योतिषी अशोक पाटील यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
advertisement
1/13

मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे.आज तुम्ही संयमाने आणि प्रेमाने सगळ्याशी बोललात तर तुमची कामे होतील. मेष राशीचा स्वामी मंगळ एकादश स्थानात असून चंद्र सिंह राशीत असल्यामुळे सर्व ठिकाणी तुम्हाला गोड बोलून राहावं लागेल. अचानकपणे आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. अनेक आनंददायी घटना तुमच्यासोबत घडतील. ज्या गोष्टींची अनेक दिवसांपासून वाट पाहत होता त्या गोष्टी आज पूर्ण होतील . कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. कुटुंबियांची साथ लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या लोकांनी आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.आज तुमच्या मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे सावधगिरी बाळगा .तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे.आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात असल्यामुळे उत्तम संपत्तीचे योग तयार होत आहेत. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे.नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतात.कामाच्या ठिकाणी यश मिळेल .प्रवासाचा देखील योग आहे. आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार विशेष योग घेऊन येत आहे. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु आज कामाचा ताण जास्त जाणवेल. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन लावा. नियोजनाने कामे केल्यास मार्गी लागतील.
advertisement
6/13
आज तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ चाखायला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील, पण तुम्ही त्या योग्य पद्धतीने हाताळाल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. प्रेमात गैरसमज होण्याची शक्यता आहे, संवाद स्पष्ट ठेवा. कन्या राशीचा स्वामी बुध पराक्रमात वाढ करणार आहे.
advertisement
7/13
तुळा राशीसाठी आजचा दिवस बरा जाईल. कामात शांतपणे निर्णय घ्या. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत फारशी अडचण येणार नाही. घरात वातावरण चांगलं राहील. मित्रांकडून मदत मिळेल आणि एखादी चांगली बातमीही कळू शकते.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या लोकांनी आज आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जा.तुमच्या आहाराकडे लक्ष द्या .आज काहीशी मानसिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे स्वतःला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्यागोष्टी करा. एखादा महत्त्वाचा निर्णय घेणे शक्यतो टाळा.
advertisement
9/13
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल, काहींना बढतीचीही शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी चालून येतील आणि फायदा होऊ शकतो. आर्थिक बाजू मजबूत राहील. प्रवासाचा योग दिसतो. प्रेमसंबंधात आनंद वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस समाधानकारक जाणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे कामे पूर्ण होतील. कुटुंबियांची साथ लाभले. नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस अति घाई संकटात जाई अश्या पद्धतीचा असणार आहे. आज कोणत्याही ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका . घाई घाईत निर्णय घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. कुंभ राशीचा स्वामी शनि उदय स्थितीत असल्यामुळे विनाकारण वाद विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
advertisement
12/13
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असेल. काम करताना प्रत्येक गोष्ट नीट तपासून घ्या, कारण छोटी चूकही त्रास देऊ शकते. पैशांच्या बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे जपून व्यवहार करा. घरात काही कारणाने मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे बोलल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya : धनलाभ होईल, अचानकपणे आनंदाची बातमी मिळेल, फक्त या चुका टाळा, आजचं राशिभविष्य