TRENDING:

Ank Jyotish: अपघाताचा धोका टळतो! कोणत्या रंगाची गाडी भाग्याची, जन्मतारखेनुसार लकी रंगांची यादी

Last Updated:
Numerology: अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून मूलांक काढता येतो. अनेक कामांसाठी तुम्ही तुमच्या मूलांकानुसार योग्य रंगांची निवड केली, तर आयुष्यात चांगल्या गोष्टी आणि यशाची शक्यता वाढते. अनेकदा लोक गाडी खरेदी करताना रंगाचा खूप विचार करतात. तज्ज्ञांच्या मते, मूलांकानुसार योग्य रंगाची गाडी निवडल्यास अपघात आणि आर्थिक नुकसानीपासून बचाव होऊ शकतो.
advertisement
1/9
अपघाताचा धोका टळतो! कोणत्या रंगाची गाडी भाग्याची, जन्मतारखेनुसार लकी रंग?
मूलांक 1 (जन्मतारीख: 1, 10, 19, 28)या मूलांकाचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. सूर्याप्रमाणे तेजस्वी राहण्यासाठी या लोकांसाठी ऊर्जावान रंग सर्वोत्तम ठरतात. अंकशास्त्रानुसार मूलांक 1 च्या व्यक्तींसाठी गोल्डन (सोनेरी) आणि पिवळा रंग अत्यंत शुभ आहे.
advertisement
2/9
मूलांक 2 (जन्मतारीख: 2, 11, 20, 29)मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे, जो शीतलता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. चंद्राची कृपा मिळवण्यासाठी सौम्य रंग उत्तम असतात. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्तींनी सिल्व्हर किंवा पांढऱ्या रंगाची गाडी खरेदी करावी.
advertisement
3/9
मूलांक 3 (जन्मतारीख: 3, 12, 21, 30)या अंकाचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. गुरु हा ज्ञान आणि विस्ताराचा कारक आहे. त्यामुळे मूलांक 3 च्या जातकांनी गाडी खरेदी करताना नारंगी रंगाची निवड करणे खूप शुभ मानले जाते.
advertisement
4/9
मूलांक 4 (जन्मतारीख: 4, 13, 22, 31)मूलांक 4 वर राहू ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. राहूचा प्रभाव संतुलित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित रंग फायदेशीर ठरतात. त्यामुळे या मूलांकाच्या लोकांनी गडद हिरव्या रंगाची गाडी निवडावी.
advertisement
5/9
मूलांक 5 (जन्मतारीख: 5, 14, 23)बुद्धी आणि संवादाचा कारक असलेला बुध ग्रह या मूलांकाचा स्वामी आहे. या लोकांसाठी फिकट आणि सौम्य रंग चांगले असतात. गाडी खरेदी करताना मूलांक 5 च्या व्यक्तींनी फिरोजा किंवा फिकट हिरव्या आणि तपकिरी रंगाची निवड करावी.
advertisement
6/9
मूलांक 6 (जन्मतारीख: 6, 15, 24)सुख-सुविधा आणि प्रेमाचा देव शुक्र या मूलांकाचा स्वामी आहे. ग्लॅमर आणि आकर्षणासाठी गुलाबी रंग यांच्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. मूलांक 6 च्या व्यक्तींनी फिकट गुलाबी रंगाची गाडी घेतल्यास अपघातांपासून त्यांचे रक्षण होते.
advertisement
7/9
मूलांक 7 (जन्मतारीख: 7, 16, 25)या मूलांकावर केतू ग्रहाचे अधिपत्य असते. केतू हा अध्यात्माचे प्रतीक असून यासाठी गडद रंग प्रभावी ठरतात. शुभ फळांच्या प्राप्तीसाठी मूलांक 7 च्या व्यक्तींनी गडद निळा किंवा इंडिगो रंगाचा वापर करावा.
advertisement
8/9
मूलांक 8 (जन्मतारीख: 8, 17, 26)न्यायाची देवता शनिदेव हे मूलांक 8 चे स्वामी आहेत. शनिदेवाची कृपा आणि आयुष्यात स्थिरता मिळवण्यासाठी गडद निळा किंवा काळा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे या लोकांनी गाडी खरेदी करताना गडद निळा किंवा काळ्या रंगाला प्राधान्य द्यावे.
advertisement
9/9
मूलांक 9 (जन्मतारीख: 9, 18, 27)अंकशास्त्रानुसार 9 हा अंक मंगळ देवाशी संबंधित आहे. हा अंक ऊर्जेने भरलेला असतो. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्तींनी गाडीसाठी लाल, मरून किंवा जांभळ्या रंगाची निवड करणे फायदेशीर ठरते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Ank Jyotish: अपघाताचा धोका टळतो! कोणत्या रंगाची गाडी भाग्याची, जन्मतारखेनुसार लकी रंगांची यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल