Gold Astro Tips: सोन्याची कोणतीच गोष्ट लाभत नाही, घालून मिरवणं 3 राशींना अनलकी; कोणाला जास्त फायदा?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gold Astrology: भारतीय परंपरेत सोन्याला मौल्यवान धातू मानले जाते, शिवाय शुभता, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. लग्नकार्यापासून ते पूजाविधीपर्यंत प्रत्येक शुभ कार्यात सोन्याला विशेष महत्त्व असते. परंतु, ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी सोने परिधान करणे फायदेशीर ठरेलच असे नाही. काही राशींसाठी सोने सौभाग्य वाढवणारे असते, तर काही राशींसाठी हाच धातू दुर्दैव आणि अडचणींचे कारण ठरू शकतो.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रात सोन्याचे महत्त्व - शास्त्रात सोन्याला सर्वोत्तम धातूचा दर्जा देण्यात आला आहे. देवी-देवतांचे दागिने आणि आसन हे सोन्याचे असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात सोन्याचा जवळचा संबंध देवगुरु गुरू ग्रहाशी जोडला जातो. गुरू हा ज्ञान, धन आणि समृद्धीचा कारक आहे. याशिवाय, सोन्याची चमक आणि तेज यामुळे त्याचा संबंध सूर्याशी देखील लावला जातो. जर कुंडलीत गुरु ग्रह अशक्त असेल, तर ज्योतिषी अनेकदा सोने परिधान करण्याचा सल्ला देतात. मात्र, सोन्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जात असल्याने ते पायात घालणे अशुभ समजले जाते.
advertisement
2/6
या राशींनी सोने अनलकी -वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरु यांच्यात सुसंवाद नसतो. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या लोकांनी जास्त सोने परिधान केल्यास त्यांना आरोग्यविषयक समस्या किंवा सुख-सुविधांमध्ये कमतरता जाणवू शकते.
advertisement
3/6
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध आणि गुरु यांच्यात मित्रता नसल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ मानले जात नाही. यामुळे मानसिक एकाग्रता कमी होऊ शकते आणि धनहानीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
advertisement
4/6
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहेत. शनि आणि गुरू यांच्या स्वभावात तफावत असल्यामुळे मकर राशीच्या लोकांनी सोने परिधान केल्यास त्यांची निर्णयक्षमता कमी होणे, व्यापारात नुकसान आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
5/6
या राशींसाठी सोने असते शुभ - ज्योतिषशास्त्रानुसार मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे अत्यंत लाभदायी मानले गेले आहे. या राशीच्या व्यक्तींनी सोने घातल्यास त्यांना सौभाग्य, मान-सन्मान आणि आर्थिक मजबुती प्राप्त होऊ शकते.
advertisement
6/6
सोने परिधान करण्याचे महत्त्वाचे नियम - एखाद्या व्यक्तीला प्रशासकीय, शैक्षणिक किंवा बौद्धिक क्षेत्रात प्रगती हवी असेल, तर सोन्याची अंगठी तर्जनी (अंगठ्याशेजारचे बोट) बोटात घालणे शुभ मानले जाते. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी आणि समाजात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी गळ्यात सोन्याची साखळी (चेन) घालणे फायदेशीर ठरते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Gold Astro Tips: सोन्याची कोणतीच गोष्ट लाभत नाही, घालून मिरवणं 3 राशींना अनलकी; कोणाला जास्त फायदा?