TRENDING:

Astrology: कष्टाचे दिवस सरले, आता 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार!

Last Updated:
Astrology: 7 मेनंतर 4 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार आहे.
advertisement
1/7
Astrology: कष्टाचे दिवस सरले, 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे राशीसोबतच एका विशिष्ट कालावधीनंतर त्यांचं नक्षत्र देखील बदलत असतात. याचा सर्व 12 राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो. आता एप्रिल महिना संपत आला असून लवकरच मे महिन्याला सुरुवात होतेय. 7 मे रोजी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
2/7
बुध ग्रह मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार असून सूर्याशी युती करून बुधादित्य राजयोग निर्माण करेल. मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला धैर्य आणि उर्जेचं प्रतीक मानलं जातं. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे 4 राशींना मोठा फायदा होणार आहे. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिलीये.
advertisement
3/7
वृषभ राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप चांगला राहणार आहे. या राशीच्या जातकांना धर्मात रस वाढेल. जोडीदारासोबत कुठेतरी धार्मिक यात्रा होऊ शकते. ज्या समस्या सुरू आहेत त्या संपतील. सूर्याच्या कृपेने रोग आणि सर्व दोष दूर होतील. मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या जातकांचा राहू-केतूच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल.
advertisement
4/7
कर्क राशीच्या लोकांसाठीही मे महिना खूप छान जाणार आहे. या महिन्यात त्यांना अनेक प्रकारचे फायदे होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना जीवनात आनंद मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. संपत्तीत वाढ होईल. पदोन्नतीची शक्यता असून जुना ताण संपेल आणि आरोग्यही सामान्य राहील. तुमच्या कामाने लोक प्रभावित होतील. तसेच जोडीदाराशी समन्वय वाढेल.
advertisement
5/7
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे हे भ्रमण खूप शुभ राहील. हा योग करिअर आणि व्यवसायाशी संबंधित अनेक चांगल्या बातम्या घेऊन येत आहे. तुमचे नशीब देखील आता तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापारी वर्गासाठी वेळ चांगला राहील.
advertisement
6/7
तुळ राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप खास असणार आहे. त्यांना देखील चांगली बातमी मिळू शकते. आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नफा मिळेल. शत्रूंचा पराभव होईल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होई. आर्थिक स्थिती सुधारून चांगलं यश मिळेल.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: कष्टाचे दिवस सरले, आता 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल