TRENDING:

Shani Asta 2026: अनपेक्षित पैशांची तंगी! अस्ताला शनी गेल्यामुळे या 4 राशींच्या अडचणी वाढणार, अलर्ट 

Last Updated:
Shani Asta 2026: ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम करत असते. न्यायाचा कारक म्हणून ओळखला जाणार शनी ग्रह 13 मार्च रोजी मीन राशीत अस्ताला जाणार आहेत. शनीची अस्त स्थिती 22 एप्रिलपर्यंत राहणार असून, हा काळ चार राशींच्या लोकांसाठी काहीसा कठीण मानला जात आहे.
advertisement
1/6
अनपेक्षित पैशांची तंगी! अस्ताला शनी गेल्याने या 4 राशींच्या अडचणी वाढणार, अलर्ट
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शनी अस्तामध्ये असल्याने या राशींना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागू शकते. आरोग्य आणि नोकरी-व्यवसायामध्ये सुद्धा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशींनी 22 एप्रिलपर्यंत खूप सावध राहून पावले उचलली पाहिजेत.
advertisement
2/6
मेष - मेष राशीच्या लोकांनी पैशांच्या बाबतीत खूप जपून राहण्याची गरज आहे. घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय तुमचे नुकसान करू शकतात. कोणालाही उसने पैसे देणे टाळा, कारण ते परत मिळणे कठीण होईल. तुमचा राग तुमच्या अडचणीत वाढ करू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. आरोग्याच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
advertisement
3/6
तूळ - शनी अस्तामध्ये असल्यामुळे तूळ राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या बचतीवर लक्ष द्यावे लागेल. कर्ज घेणे किंवा मोठी गुंतवणूक करणे सध्या टाळावे. तब्येतीत चढ-उतार जाणवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विनाकारण वाद आणि भांडणांपासून लांब राहा.
advertisement
4/6
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक वादाचा ठरू शकतो. विशेषतः संपत्तीच्या कारणावरून घरात मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्याची छोटी समस्या पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकते, त्यामुळे वेळीच उपचार घ्या. अहंकार आणि रागामुळे तुमची कामे बिघडू शकतात, त्यामुळे नम्र राहा.
advertisement
5/6
मकर राशीच्या लोकांचे खर्च अचानक वाढतील. आतापर्यंत ज्या गुंतवणुकीतून फायदा मिळत होता, तिथे अचानक तोटा होऊ शकतो. मानसिक तणाव आणि थकवा जाणवण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या करिअरसाठी धोक्याचा ठरू शकतो, त्यामुळे शांत राहून विचार करा.
advertisement
6/6
शनीच्या या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारी शनी देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे, त्यात काळे तीळ टाकल्यास अधिक उत्तम. दर शनिवारी शनी चालीसा वाचा आणि काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या. तसेच तुमच्या शक्तीनुसार गरीब लोकांना काळे तीळ, गरम ब्लँकेट किंवा काळी उडीद डाळ दान करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Asta 2026: अनपेक्षित पैशांची तंगी! अस्ताला शनी गेल्यामुळे या 4 राशींच्या अडचणी वाढणार, अलर्ट 
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल