TRENDING:

Budh Vakri 2026: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बुधाची वक्री चाल; 4 राशींवर बालंट, भलत्याच अडचणीत

Last Updated:
Budh Vakri 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह 26 फेब्रुवारी 2026 रोजी कुंभ राशीत वक्री चाल सुरू करणार आहे. 21 मार्च 2026 पर्यंत बुध याच स्थितीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी, विवेक आणि व्यापाराचा कारक मानला जातो. बुधाच्या या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम किंवा अडचणी येण्याची शक्यता आहे. या काळात शिक्षण, करिअर आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्या राशींनी विशेष सावध राहावे:
advertisement
1/4
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बुधाची वक्री चाल; 4 राशींवर बालंट, भलतीच अडचण
कर्क - बुधाची वक्री चाल तुमच्या त्रासात भर टाकू शकते. करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. कामात चुका होऊ नयेत म्हणून प्रत्येक गोष्ट अत्यंत सतर्कतेने करा. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांचा किंवा मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. प्रकृतीची काळजी घेणे हितकारक ठरेल.
advertisement
2/4
कन्या - तुमच्या आयुष्यात अचानक काही बदल घडू शकतात. काही लोकांची नको असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते. करिअरमधील परिस्थिती तुमच्या विरोधात जात आहे असे वाटेल, पण अशा वेळी संयम राखून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, परिस्थिती नक्कीच सुधारेल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या मार्गात काही अडथळे येऊ शकतात. आरोग्याची ही काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/4
मकर - तुमच्या दुसऱ्या भावात बुध वक्री होणार आहे. हे स्थान वाणीचे असल्याने तुमच्या बोलण्यात दोष निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी बोलताना जपून बोला, अन्यथा तुमचे हितचिंतकही तुमच्या विरोधात जाऊ शकतात. शिक्षणाच्या बाबतीत सावध राहा आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहा. घसा आणि कानाशी संबंधित आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
4/4
मीन - तुमच्या व्यय भावात बुधाचे वक्री होणे अडचणी निर्माण करू शकते. या काळात विचार न करता केलेली गुंतवणूक महागात पडू शकते. वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा आणि सतर्क राहा. मुलांच्या प्रकृतीमुळे तुमची चिंता वाढू शकते. काही लोकांची पदोन्नती लांबणीवर पडल्याने निराशा येईल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Budh Vakri 2026: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बुधाची वक्री चाल; 4 राशींवर बालंट, भलत्याच अडचणीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल