6 दिवसांनंतर नशीब पालटणार! देवी लक्ष्मीची बसरणार 'या' 3 राशींवर कृपा, होणार जबरदस्त प्रॉफिट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फेब्रुवारी 2026 हा महिना अत्यंत वेगवान घडामोडींचा ठरणार आहे. आज 9 फेब्रुवारी असून, येत्या 6 दिवसांनंतर म्हणजेच 15 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांची स्थिती बदलणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फेब्रुवारी 2026 हा महिना अत्यंत वेगवान घडामोडींचा ठरणार आहे. आज 9 फेब्रुवारी असून, येत्या 6 दिवसांनंतर म्हणजेच 15 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांची स्थिती बदलणार आहे. या दिवशी महाशिवरात्रीचा पावन पर्व तर आहेच, पण सोबतीला चंद्र आणि मंगळ यांची शुभ युती होणार आहे.
advertisement
2/7
जेव्हा चंद्र आणि मंगळ एकाच राशीत येतात, तेव्हा ज्योतिषशास्त्रात याला 'लक्ष्मी योग' किंवा 'महालक्ष्मी योग' म्हटले जाते. हा योग आर्थिक समृद्धी, रिअल इस्टेटमध्ये फायदा आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान 3 राशी.
advertisement
3/7
चंद्र हा मनाचा आणि पैशांच्या प्रवाहाचा कारक आहे, तर मंगळ हा साहस आणि जमिनीचा कारक आहे. या दोन ग्रहांच्या संयोगामुळे व्यक्तीला कष्टाचे पूर्ण फळ मिळते.
advertisement
4/7
15 फेब्रुवारीला कुंभ राशीत आधीच उपस्थित असलेल्या ग्रहांसोबत जेव्हा चंद्राचा प्रभाव जोडला जाईल, तेव्हा धनलक्ष्मी प्रसन्न होण्याचे योग येतील. यामुळे केवळ आर्थिकच नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढणार आहे.
advertisement
5/7
मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. चंद्र-मंगळ युतीमुळे मेष राशीच्या जातकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात केलेली गुंतवणूक दुप्पट नफा देईल.
advertisement
6/7
वृषभ: वृषभ राशीसाठी हा लक्ष्मी योग करिअरमध्ये मोठी झेप घेणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढीची आनंदाची बातमी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. रिअल इस्टेट किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून अचानक धनलाभ होईल.
advertisement
7/7
कुंभ: कुंभ राशीत सध्या ग्रहांची मोठी गर्दी आहे. चंद्र आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि घरातील आर्थिक ओढाताण संपेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
6 दिवसांनंतर नशीब पालटणार! देवी लक्ष्मीची बसरणार 'या' 3 राशींवर कृपा, होणार जबरदस्त प्रॉफिट