TRENDING:

लव्ह, लग्न, डिवोर्स! चंद्रग्रहणाचा 2 राशींवर होणार जबरदस्त परिणाम, सुखी संसारात येणार वादळ

Last Updated:
3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण होळीच्या दिवशी लागत असून ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.
advertisement
1/6
चंद्रग्रहणाचा 2 राशींवर होणार जबरदस्त परिणाम, सुखी संसारात येणार वादळ
3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण होळीच्या दिवशी लागत असून ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.
advertisement
2/6
हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र असल्याने, याचा सर्वात मोठा आणि नकारात्मक प्रभाव लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणार आहे.
advertisement
3/6
विशेषतः काही राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आव्हाने घेऊन येणारे ठरेल. या काळात सावध न राहिल्यास नात्यात कायमचा दुरावा होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
advertisement
4/6
चंद्र हा मनाचा स्वामी आहे आणि ग्रहणावेळी तो पीडित होतो. काही राशींसाठी हे ग्रहण अशा भावात होत आहे, जिथे भावनांचा उद्रेक आणि अहंकाराचा संघर्ष होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील हे ग्रहण जुन्या जखमा ताज्या करू शकते, ज्यामुळे जोडीदारासोबतचे मतभेद विकोपाला जाऊ शकतात.
advertisement
5/6
मेष: मेष राशीसाठी हे ग्रहण पाचव्या भावात होत आहे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये अचानक तणाव निर्माण होईल. छोट्याशा गैरसमजातून मोठे भांडण होऊ शकते. पास्ट रिलेशनशिपमधील काही गोष्टी समोर आल्याने सध्याच्या नात्यात अडथळे येतील आणि नातं तुटण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या वागण्याकडे संशयाने पाहणे टाळा.
advertisement
6/6
कुंभ: कुंभ राशीसाठी हे ग्रहण सातव्या भावात घडणार आहे. पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद तीव्र होतील. एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने नाराजी वाढेल. जर तुमचे नाते आधीच नाजूक असेल, तर या काळात 'विभक्त' होण्याचे विचार मनात येऊ शकतात. बोलताना संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
लव्ह, लग्न, डिवोर्स! चंद्रग्रहणाचा 2 राशींवर होणार जबरदस्त परिणाम, सुखी संसारात येणार वादळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल