Numerology: काय करावं सूचत नाही? जन्मतारखेवरून करिअर निवडू शकता; सापडेल स्वत:चा स्पार्क
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Career According to Lucky Number: अंकशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, ज्याद्वारे आपण आपल्या जीवनातील विविध गोष्टींची माहिती मिळवू शकतो. व्यक्तीच्या जन्मतारखेशी संबंधित दोन महत्त्वाचे अंक असतात, मूलांक आणि भाग्यांक. प्रत्येक अंकाचा स्वतःचा विशेष प्रभाव असतो आणि तो व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये, म्हणजे करिअर आणि नोकरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. या लेखात ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून मूलांकावर आधारित करिअरशीसंबंधित संधींबद्दल जाणून घेऊ.
advertisement
1/9

मूलांक 1 - मूलांक 1 असलेले लोक नेतृत्वाच्या भूमिकेत चांगले असतात. त्यांनी अशा करिअरमध्ये वाटचाल करावी जिथे त्यांना निर्णय घेण्याची, दिशा देण्याची आणि संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. हे लोक उद्योजकता, व्यवस्थापन आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात यश मिळवू शकतात.
advertisement
2/9
मूलांक 2 - मूलांक 2 असलेले लोक भागीदारीत काम करण्यात तज्ज्ञ मानले जातात. हे लोक डॉक्टर, सल्लागार, फिजिओथेरपिस्ट किंवा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आपले करिअर घडवू शकतात, त्यातून ते इतरांना मदत करू शकतात.
advertisement
3/9
मूलांक 3 - मूलांक 3 असलेले लोक मिलनसार, आकर्षक आणि उत्साही असतात. समाजाशी एकरूप होऊन काम करणारे असणारे हे लोक अभिनय, लेखन, संगीत, गायन किंवा अध्यापन यासारख्या क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात.
advertisement
4/9
मूलांक 4 - मूलांक 4 असलेले लोक गंभीर स्वभावाचे आणि बहुप्रतिभावान असतात. असे लोक संपादक, लेखक, पत्रकार, वकील, अभियंते किंवा संशोधक म्हणून यश मिळवू शकतात. त्यांची सखोल विचारसरणी आणि विश्लेषणात्मक क्षमता त्यांना या क्षेत्रातील नेते बनवते.
advertisement
5/9
मूलांक 5 - मूलांक 5 असलेले लोक बहुप्रतिभावान असतात आणि कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची क्षमता त्यांच्यात असते. या व्यक्तींसाठी लेखक, समीक्षक, अभिनेता, संगीतकार, गुप्तहेर, पत्रकार, निर्माता-दिग्दर्शक अशी क्षेत्रे योग्य आहेत.
advertisement
6/9
मूलांक 6 - मूलांक 6 असलेले लोक जबाबदार आणि आदरणीय व्यक्तिमत्वाचे नागरिक असतात. ते कला, वास्तुकला, फॅशन डिझायनिंग, औषध किंवा जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात. असे लोक समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना चांगले काम करतात.
advertisement
7/9
मूलांक 7 - मूलांक 7 असलेले लोक आध्यात्मिक, गंभीर आणि अंतर्मुखी असतात. या लोकांसाठी लेखन, अध्यापन, समुपदेशक किंवा डॉक्टर ही योग्य कामे आहेत. माहिती देणे आणि समजावून सांगण्याची क्षमता यांच्यामध्ये सर्वोत्तम असते.
advertisement
8/9
मूलांक 8 - मूलांक 8 असलेले लोक व्यवस्थापन, प्रशासन आणि वित्त क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात. हे लोक बँकर, राजकारणी किंवा इतर उच्च प्रशासकीय पदांवर यश मिळवू शकतात. त्यांची ताकद त्यांच्या धडाकेबाज निर्णय घेण्याच्या क्षमतेत असते.
advertisement
9/9
मूलांक 9 - मूलांक 9 असलेल्या लोकांमध्ये समाजात उच्च स्थान मिळवण्याची क्षमता असते. हे लोक खेळाडू, खगोलशास्त्रज्ञ किंवा मोठ्या व्यवसायात यश मिळवू शकतात. मूलांक संख्या त्यांना त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर पोहोचण्याची क्षमता देते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: काय करावं सूचत नाही? जन्मतारखेवरून करिअर निवडू शकता; सापडेल स्वत:चा स्पार्क