TRENDING:

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीला राशीनुसार या गोष्टींचे करा दान, नशीबाची मिळेल साथ

Last Updated:
Kartiki Ekadashi 2023: चतुर्मासाच्या चार महिन्यांनंतर आज प्रबोधिनी एकादशी दिवशी भगवान विष्णू गाढ झोपेतून जागे होतात आणि सृष्टीची जबाबदारी हाती घेतात, असे मानले जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. आजच्या दिवशी आपल्या राशीनुसार काही वस्तूंचे दान केल्यास भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात, पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
1/12
कार्तिकी एकादशीला राशीनुसार या गोष्टींचे करा दान, नशीबाची मिळेल साथ
मेष: मेष राशीच्या लोकांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दूध, दही, तांदूळ आणि साखर या किंवा यापैकी एकाचे दान करावे.
advertisement
2/12
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी तांदूळ आणि साखरेचे दान करावे.
advertisement
3/12
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्यांचे दान करावे. गाईला चारा द्यावा.
advertisement
4/12
कर्क: कर्क राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र आणि अन्न गरीब असहाय लोकांना दान करावे.
advertisement
5/12
सिंह: सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गहू, मूग डाळ, गूळ आणि शेंगदाणे दान करावे.
advertisement
6/12
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी श्री हरी विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हिरव्या रंगाची साडी दान करावी.
advertisement
7/12
तूळ: तूळ राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तांदूळ, साखर आणि दूध दान करावे.
advertisement
8/12
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी केशरयुक्त दूध दान करावे.
advertisement
9/12
धनु: धनु राशीच्या लोकांनी साखर, गूळ आणि लाल वस्त्रांचे दान करावे.
advertisement
10/12
मकर: मकर राशीच्या लोकांनी धन दान करावे.
advertisement
11/12
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी वस्त्र दान करावे.
advertisement
12/12
मीन: मीन राशीच्या लोकांनी केळी, केशर आणि हरभरा डाळीचे दान करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीला राशीनुसार या गोष्टींचे करा दान, नशीबाची मिळेल साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल